आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईत ८६ वर्षांच्या कुसुम व ७८ वर्षांच्या अम्मांनी व्हीलचेअरवरून धावण्याची स्पर्धा केली पूर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - जिद्दीपुढे गगनी ठेंगणे असे म्हणतात. त्यामुळे अशक्य कोटीतली कामेही शक्य होतात. असेच उदाहरण दुबईतील कुसुम भार्गव व ७८ वर्षांच्या ईश्वरी अम्मा यांनी घालून दिले. या दोघींनी दुबईत ५ किमी अंतर धावण्याच्या स्पर्धेत व्हीलचेअरच्या साह्याने भाग घेतला होता. ही स्पर्धा त्यांनी यशस्वीरीत्या पूर्णही केली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुम व ईश्वरी दुबईत धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वात ज्येष्ठ महिला होत्या. या स्पर्धेत सहभागी झालो याचाच खूप आनंद होता. कुसुम यांनी सांगितले, मी अनेक लोकांना तेथे भेटले. त्यांनी माझ्यासोबत छायाचित्रेही काढून घेतली. मी ५ किमी अंतर धावले. याचे श्रेय माझ्या सुनेला जाते. तर शारजाह येथील अम्मा यांनी सांगितले, माझी सून व नावांनी प्रोत्साहन दिल्याने या स्पर्धेत मी सहभागी झाले. माझ्या कुटुंबातील सदस्यांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला होता. माझा मुलगा शेख कायदे रस्ते व आजूबाजूच्या इमारती दाखवत असे. आज माझ्या पायावर येथे उभी राहण्याचा हा अनुभव खरेच खूप कमालीचा रोमांचक होता, असे अम्मा म्हणाल्या.