आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 8600 In The District And 18 Thousand Free Electricity Consumers In The City

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यामध्ये 8600 तर शहरात 18 हजार फुकटे वीज ग्राहक; मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिले पडताळणीचे आदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- परिमंडळात ऑक्टोबर महिन्यात ४० हजार २२८ ग्राहकांचा वीजवापर ० युनिट, तर १ लाख ८५ हजार ५३९ ग्राहकांचा वीजवापर १ ते ३० युनिटदरम्यान असल्याचे समोर आले आहे. यात औरंगाबाद शहरातील १७ हजार ९२८ जण फुकट वीज वापरत आहेत. हा वीजवापर प्रत्यक्षात आहे की नाही, याची पडताळणी करण्याचे आदेश मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सर्व विभाग कार्यालयांना दिले आहेत. त्यानुसार येत्या ५ दिवसांत या ग्राहकांची तपासणी होईल. 

 

शून्य वीजवापर आढळलेल्या ग्राहकांची विभागनिहाय संख्या 
औरंगाबाद शहर-१ ७९२२ 
औरंगाबाद शहर-२ १०००६ 
औरंगाबाद ग्रामीण-१ ४७४० 
औरंगाबाद ग्रामीण-२ ३९०२ 

 

१ ते ३० युनिट वीजवापर आढळलेल्या ग्राहकांची विभागनिहाय संख्या 
औरंगाबाद शहर-१ १३०३० 
औरंगाबाद शहर-२ - १३४१२ 
औरंगाबाद ग्रामीण-१ - ३१००० 
औरंगाबाद ग्रामीण-२ - २९३८६