7 जानेवारीला 86 / 7 जानेवारीला 86 हजार वीज कर्मचाऱ्यांचा संप; समान काम समान वेतन लागू करण्याची मागणी

Jan 05,2019 07:46:00 AM IST

चांदवड (जि. नाशिक)- महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या वीज कंपन्यांतील ८६ हजार अधिकारी, कर्मचारी व अभियंत्यांचे नेतृत्व करणाऱ्या ६ प्रमुख संघटनांच्या कृती समितीने ७ जानेवारीला संप पुकारल्याची माहिती कृती समिती फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी दिली.

महावितरणने कर्मचाऱ्यांची पुनर्रचना करताना संघटनांच्या सूचना अमलात आणाव्या, महापारेषणातील स्टाफ सेटअप लागू करताना मंजूर पदे कमी करू नये, इन व्यवस्थापनाचे महावितरणतर्फे राबवण्यात येत असलेले खासगीकरण धोरण थांबवावे, फ्रँचायझीकरण खासगी भांडवलदार कंपन्यांना देण्याची प्रक्रिया थांबवावी, महानिर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत लघु जलविद्युत निर्मिती संचाचे अधिग्रहण न करता कार्यरत ठेवावे, २१० मेगावॅटचे संच बंद करण्याचे धोरण थांबवावे, जुनी पेन्शन योजना लागू ठेवावी, रिक्त पदे तातडीने भरावी, बदली धोरणाच्या पुनर्विचार संघटनांसोबत चर्चा करून राबवण्यात यावा, कंत्राटी व आऊटसोर्स कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कायम करावे, न्यायालयाच्या निकालानुसार समान काम समान वेतन निर्णयाची अंमलबजावणी करावी, औरंगाबाद, जळगाव व इचलकरंजी शहराच्या खासगीकरणाबाबतचा सर्व्हे बंद करावा, अशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.

X