आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 87 व्या वर्षी तरुण पत्नीला दिला घटस्फोट; म्हणाला, मला दुसरी मिळाली...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - रशियातील एका 87 वर्षीय वृद्धाचा घटस्फोट माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनला. त्याने आपल्या 28 वर्षीय पत्नीला घटस्फोट दिला आहे. त्याला इतकी तरुण पत्नी मिळालीच कशी असा विचार करत असाल तर या घटस्फोटाचे कारण त्याहून धक्कादायक आहे. घटस्फोट देत असताना त्याने आपल्याला तिच्यापेक्षा सुंदर आणि तरुण गर्लफ्रेंड मिळाली असे कारण दिले आहे. या वयातही तो ज्या तरुणीला घटस्फोट देतोय ती त्याची चौथी पत्नी होती. त्या दोघांचा विवाह 4 वर्षांपूर्वी थाटात पार पडला होता. आता हा माणूस आपल्या 5 व्या लग्नाची तयारी करत आहे. त्याने दुसरी गर्लफ्रेंड का निवडली याचेही कारण दिले.


कोण आहे तो?
मॉस्कोत राहणाऱ्या 87 वर्षीय व्यक्तीचे नाव इव्हान क्रास्को असून तो एक अभिनेता आहे. एक प्रोफेशनल स्टेज अॅक्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या इव्हानने आतापर्यंत रशियातील 140 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. 2015 मध्ये 84 वर्षांचा असताना तो त्यावेळी 24 वर्षांची असलेल्या नतालियाच्या प्रेमात पडला होता. याच वर्षी त्याने नतालियासोबत चौथा विवाह देखील केला. या विवाहाच्या 5 वर्षांपूर्वी तो आजोबा बनला होता. आता इव्हानने नतालियाला घटस्फोट देऊन त्याची नवीन गर्लफ्रेंड युलियासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे.


शारीरिक संबंधांना नकार देत असल्याने घटस्फोट
इव्हानने सांगितल्याप्रमाणे, लग्नाच्या काही दिवसांनंतर त्याने नतालियाच्या मुलाचा बाप होण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, नतालियाने यास स्पष्ट नकार दिला. एवढेच नव्हे, तर आपण आई होणार या भीतीने तिने इव्हानसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासही नकार दिला होता. पत्नी नतालिया दूर असताना तो आपली एक थिएटर फॅन युलियाच्या संपर्कात आला. 27 वर्षीय युलिया गेल्या अनेक महिन्यांपासून आपला आवडता अभिनेता इव्हानच्या नाटकाला हजेरी लावत होती. हळू-हळू त्यांचे बोलणे सुरू झाले आणि मैत्री प्रेमात बदलली. आता हे दोघे लवकरच लग्न करणार आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...