आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 9 85 Core Corporate Donations Received By The National Parties In Two Years, BJP Got Rs 915 Core : ADR Report

राष्ट्रीय पक्षांना २ वर्षांत ९८५ काेटींच्या कॉर्पोरेट देणग्या, भाजपला ९१५ काेटी रुपये मिळाले : एडीआरचा अहवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली | देशातल्या ६ राष्ट्रीय पक्षांना दाेन वर्षात १०५९.२५ काेटी रुपये देणग्या मिळाल्या. ९८५.१८ काेटी म्हणजे ९३ % तर काॅर्पाेरेट घराणी, व्यापाऱ्यांनी दिल्याचे एडीआरच्या अहवालात म्हटले. अहवालात  पक्षांचे २०१६-१७, २०१७-२०१८ वर्षातील आकडेवारी दिली आहे. २००४-०५ पासून मिळालेल्या देणग्यांच्या तुलनेत ही रक्कम १६० % आहे. २० हजारपेक्षा जास्त देणग्या मिळणारे भाजप, काँग्रेस, एनसीपी, सीपीआआय, सीपीएम, टीएमसी हे ६ पक्ष, २० हजारपेक्षा जास्त देणग्या मिळणारे ६ पक्ष आहेत. बसपा यात नाही, त्याला काेणी २० हजारपेक्षा जास्त देणगी दिली नाही. सर्वािधक ९१५.६ काेटी भाजपला मिळाले.


बेनामी : पक्षांनी ९१६ देणगीदारांचे पॅन क्रमांक आणि पत्ते दिले नाहीत
> पक्षांनी ९१६ देणगीदारांचे पत्ते दिलेे नाहीत.
> पक्षांना बेनामी पत्त्यांद्वारे एकूण १२०.१४ काेटी रू मिळले.
> ७६ अशा देणग्याही आल्या ज्यांनी पॅक क्रमांक दिला नाही. यांच्याकडून पक्षांना २.५९ काेटी रुपये मिळाले.
> भारतीय कम्युनिस्ट पार्टीला (सीपीआआय) कॉर्पोरेट क्षेत्राकडून सर्वात कमी देणगी मिळाली.  
> भाजपसह सहा पक्षांना ८ क्षेत्रातून सर्वात जास्त देणग्या मिळाल्या. 
> सर्वात जास्त ४९.६ % (४८८ काेटी रु.) देणगी इलेक्टोरल ट्रस्टने दिली.


माेठे देणगीदार : प्रुडंट/सत्या इलेक्टाेरल ट्रस्टने भाजप, काँग्रेसला ४२९ काेटी देणगी
> दाेन वर्षांत प्रुडंट/सत्या इलेक्टोरल ट्रस्ट कडून भाजप, काँग्रेसला सर्वात जास्त देणगी मिळाली.
> या ट्रस्टने ४६ वेळा ४२९ काेटी रु. दिले.
> याने भाजपला ३३ वेळा ४०५ काेटी रु. तर कांॅग्रेसला १३ वेळा २३.९ काेटी रु. दिले.  
> भद्रम जनहित शालिका ट्रस्ट भाजप आणि काँग्रेसचा दुसरा सर्वात माेठा कॉर्पोरेट देणगीदार, ज्याने १० वेळा ४१ काेटी रु. दिले. 
> एनसीपीला बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शन  टेक्नॉलॉजी प्रा.लि.ने २.५ काेटी रु. देणगी दिली.

 

वाढती देणगी > ६ वर्षे पहिल्या पक्षांना ८२ काेटी मिळाले,  २०१८ मध्ये ते पाचपट झाले
> भाजपसह सहा पक्षांना २०१२-१३ मध्ये एकूण ८२ काेटी रु. देणगी मिळाली हाेती.{२०१७-१८ मध्ये वाढून ती ४२२ म्हणजे पाचपट झाली.
> २०१५-१६ मध्ये सर्वात कमी ७७ काेटी रु. देणगी मिळाली.