आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक दोन नव्हे तर तब्बल हे 9 कलाकार सांभाळणार अवॉर्ड शोमध्ये सूत्रसंचालनाची धुरा  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते आणि शेवंता म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर - Divya Marathi
राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते आणि शेवंता म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर

बॉलीवूड डेस्कः दिवाळीचा सण जवळ आला की प्रेक्षकांना उत्सुकता असते ती ‘झी मराठी अवॉर्डस’च्या रंगतदार आतिषबाजीची. या सोहळ्यात कोणती व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट ठरणार? लोकप्रिय नायक, नायिकेच्या पुरस्काराची विजयी माळ कुणाच्या गळ्यात पडणार? लोकप्रिय मालिकेचा मान कुणाला मिळणार? असे उत्सुकतापूर्ण प्रश्न सर्वांच्या मनात असतात. अशीच उत्सुकता यंदाही प्रेक्षकांना आहे. यावर्षी 'माझ्या नवऱ्याची बायको', 'मिसेस मुख्यमंत्री', 'अगंबाई सासूबाई', ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि 'रात्रीस खेळ चाले 2' या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली.


झी मराठीवरील मालिकांमधील प्रमुख भूमिका निभावणारे नायक नायिका प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य करतात. झी मराठी अवॉर्ड्सच्या निमित्ताने हे सर्व कलाकार एकत्र एका मंचावर येतात. या कार्यक्रमाला रंगत येते ती म्हणजे हलक्याफुलक्या आणि रंजक सूत्रसंचालनाने. यावेळी झी मराठी अवॉर्ड्सचं सूत्रसंचालन एक-दोन नाही तर चक्क 9 कलाकार करणार आहेत. पांडू-अण्णा-शेवंता, गुरुनाथ-राधिका-शनाया, अभिजित राजे-आसावरी आणि सुमी हे सर्व मंचावर सूत्रसंचालनासाठी सज्ज होणार आहेत. प्रेक्षकांचे आवडते झी मराठीचे सर्व कलाकार त्यांच्या हटके स्टाईलने मंचावर येऊन सूत्रसंचालन करतील तेव्हा कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढेल यात शंकाच नाही.