आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरपुड्यानंतर लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही हे बॉलिवूड कपल, जाणून घ्या का ऐनवेळी मोडले या सेलेब्सचे लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी लग्नाअगोदर एकमेकांना डेट केले. यातील काही नाती तर साखरपुड्यापर्यंतही पोहोचल्या. पण ऐनवेळी यांचे लग्न मोडले. यात रवीना-अक्षयपासून सलमान, अक्षयकुमार यांचाही समावेश आहे ज्यांचे लग्न ऐनवेळी मोडले.

 

रवीना टंडन आणि अक्षय कुमार 
- मोहरा चित्रपटात सोबत काम केल्यापासून अक्षय-रवीनाचे अफेअर सुरु झाले. यादोघांमध्ये तीन वर्षांपर्यंत प्रेमसंबंध होते.
- एका मुलाखतीत रवीनाने सांगितले की, तिने अक्षयसोबत एका मंदिरात गुपचूप साखपरपूडाही केला. अक्षयला त्याची लोकप्रियता कमी होईल याची जास्त चिंता होती, म्हणून त्याने ही गोष्ट सर्वांपासून लपविली असे रवीना म्हटली.
- दोघांचे नाते लग्नाजवळ येऊन पोहोचले होते त्याचवेळी अक्षयच्या आयुष्यात शिल्पा आली. अक्षय रवीना आणि शिल्पाला सोबतच डेट करत होता असेही म्हटले जाते.

यानंतर अक्षय कुमारने अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि रवीनाने बिजनेसमॅन अनिल थडानीसोबत विवाह केला.

 

अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर
- करिष्मा-अभिषेकमध्ये अभिशेकची बहिण श्वेताच्या लग्नात प्रेमांकुर फुलला. श्वेता बच्चनचे लग्न करिश्माच्या आत्याच्या मुलासोबत झाले आहे. या लग्नावेळी दोघे एकमेकांच्या जवळ आले.
- याचवेळी अभिषेकला त्याचा डेब्यू चित्रपट रेफ्युजी मिळाला. त्यात करिना त्याची अभिनेत्री होती. असे म्हणतात की करिना अभिषेकला सेटवर जीजू म्हणत असे. 
- यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वाढदिवशी अभिषेक-करिश्माचा साखरपुड्याची घोषणा केली.
- असे म्हणतात की, त्यावेळी करिश्माची आई बबिताला हे लग्न मंजूर नव्हते. त्यावेळी करिश्मा टॉपची अभिनेत्री होती तर अभिषेकचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटत होते.
- बबिताला ही भीती होती की जर अभिषेक सफल नाही झाला तर कसे होणार. करिश्माही आईच्या निर्णयाला विरोध करु शकली नाही आणि अखेर त्यांचा साखरपुडा तुटला.
- त्यानंतर अभिषेकने ऐश्वर्या रॉयबरोबर विवाह केला आणि करिश्मा कपूरने लहानपणीचा मित्र संजय कपूरबरोबर लग्न थाटले. करिश्मा-संजयचा आता घटस्फोट झाला आहे आणि करिश्मा दुसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे. संजय कपूरनेही प्रिया चटवालबरोबर विवाह थाटला आहे.


पुढच्या स्लाईडवर पाहा, असे काही सेलेब्स ज्यांचा ऐनवेली तुटला विवाह..
 

 

बातम्या आणखी आहेत...