आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेळगाव: टँकर आणि क्रूझरच्या भीषण अपघातामध्ये नऊ तरूणांचा जागीच मृत्यू, होळी साजरी करून घरी परतत होते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बेळगाव- गोव्यात होळी साजरी करून घरी परतत असलेल्या तरूणांचा बेळगावमध्ये भीषण अपघात झाला. हे सर्व तरूण ज्या क्रूझर गाडीने येत होते, त्या गाडीने टँकरला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, अपघातात गाडीतील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. 

 

सर्व मृत तरूण कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूरचे रहिवासी आहेत. होळी साजरी करण्यासाठी हे सर्वजण गोव्याला गेले होते. होळी साजरी करून ते गोव्याहून घरी परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

 

क्रझरचा चालक गाडी अतिवेगाने चालवत होता, शिवाय त्याला गाडी चालवत असताना डुलकी लागल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.