आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीच्या वादातून गोळीबर: 9 जणांचा मृत्यू तर 25 जखमी, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनभद्र(उत्तर प्रदेश)- जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झालाय, तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोनभद्र येथील घोरावल कोतवाली परिसरातील उभभा गावात आज(बुधवार) घटना घडली. जमिनीच्या वादातून झालेल्या या गोळीबारानंतर गावात पोलिस अधीक्षकांसह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तैणात करण्यात आला आहे. गोळीबार गावाचा सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे सांगितले जात आहे.

 


या घटनेनंतर संध्याकाळी 4 वाजता गावाजवळील रुग्णालयात मृत आणि जखमींना आणण्यात आले. यावेळी नऊ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर 25 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, 100 एकर जमिनीसाठी जुन्या वैमन्यस्यातून दोन गटांमध्ये आधी वाद झाला त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोळीबारही करण्यात आला, अशी माहिती स्थानिकांनी दिली. सध्या या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

 

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, पोलिस महासंचालक ओ.पी. सिंह यांना घटनेवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जखमींना आरोग्यासेवा पुरवण्यात कुठलाही हलगर्जीपणा होता कामा नये, असेही योगी  यांनी अधिकाऱ्यांनी सांगितले.