आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्समध्ये 9 फुटी अजगर पकडला, महिनाभरात दुसरा अजगर मिळाल्याने लोकांमध्ये प्रचंड भीती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
9 फूट लांबीचा अजगर. - Divya Marathi
9 फूट लांबीचा अजगर.

मुंबई - येथील वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समध्ये सोमवारी रात्री आखणी एका अजगराला पडकण्यात आले. याच परिसरात मागच्या महिन्यातही एका अजगराला पडकले होते. त्यानंतर सोमवारी रात्री लोकांनी आणखी दोन अजगर दिसल्याची तक्रार केली. त्यानंतर एका अजगराला पकडण्यात आले. हा अजगर तब्बल 12 फूट लांबीचा होता. तर दुसरा अजगर मात्र हाती आला नाही. 

Mumbai: Police rescued a python from near Bandra Kurla Complex last night pic.twitter.com/5xExbiYu2L

— ANI (@ANI) October 9, 2018

या परिसरामध्ये अनेक कंपन्यांची कार्यलये आहेत. जवळपास वर्षभरापासून नागरिक याठिकाणी अजगर दिसत असल्याची तक्रार करत आहेत. त्यात सोमवारी पुन्हा एकदा दोन अजगर दिसल्याचे समजताच पोलिस सर्पमित्राला घेऊन याठिकाणी पोहोचले. त्या सर्पमित्राने हा तब्बल 9 फूट लांब अजगर पकडला. लोकांनी अजगर दिसल्याची तक्रार केली त्यापैकी दुसरा अजगर यापेक्षाही मोठा म्हणजे तब्बल 10 ते 12 फूट लांबीचा होता, अशी माहिती समोर येतेय. हा अजगर सर्पमित्राच्या हाती आला नाही. गेल्या वर्षभरात या परिसरातून जवळपास 15 हून अधिक अजगर पकडले आहेत. 

 

 

बातम्या आणखी आहेत...