आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये गर्दीत माथेफिरूने भरधाव कार घुसवून लोकांना चिरडले, 9 जण ठार, संशयित हल्लेखोराला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनच्या हुनान प्रांतातील हेंगडॉन्ग काउंटीमध्ये एका माथेफिरूने वर्दळीच्या परिसरात बेदरकारपणे कार घुसवली. यामुळे 9 जण ठार झाले आणि 46 जखमी झाले आहेत. पोलिसांनी संशयित हल्लेखोराला अटक केली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या या घटनेला दहशतवादी कारवाईशी जोडण्यात आलेले नाही.

 

बीजिंग यूथ डेलीनुसार, 54 वर्षीय आरोपीचे नाव यांग जेनयुन असे सांगितले जात आहे. तो हेंगडॉन्ग काउंटीचाच रहिवासी आहे. यांगला यापूर्वी अनेक केसेसमध्ये तुरुंगवास झालेला आहे.

 

चीनमध्ये वाढताहेत हिंसक घटना: 
मागच्या काही वर्षांत चीनमध्ये हिंसक घटना उदा. बॉम्बस्फोट, बसेस आणि इमारतींत जाळपोळ वाढलेली आहे. अनेकदा लोक व्यक्तिगत कारणे वा समाजावर संतापून हिंसा करताना दिसले आहेत. कधी-कधी घटनेमध्ये दहशतवाद्यांचा हात असतो. 2013 मध्ये बीजिंगच्या फॉरबिडन सिटीमध्ये गर्दीत एक घर घुसवण्यात आली होती. ज्या कारमध्ये बसलेल्या लोकांसहित 8 ठार झाले होते. पोलिसांनी यामागे मुस्लिम फुटीरवाद्यांचा हात असल्याचे सांगितले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...