Home | Bollywood | Marathi Cinekatta | 9 Marathi films will be released on one day

एकाच दिवशी 9 मराठी चित्रपट प्रदर्शित होणार, नव्या चेहऱ्यांना संधी, 'भाई- व्यक्ती की वल्ली'कडे लक्ष 

प्रतिनिधी | Update - Feb 08, 2019, 10:22 AM IST

एकाच दिवशी इतके चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय काहींच्या अंगाशी येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. 

 • 9 Marathi films will be released on one day

  पुणे. मराठी चित्रपटांच्या विश्वात ८ फेब्रुवारीचा दिवस लक्षणीय ठरणार आहे. कारण या एकाच दिवशी तब्बल नऊ मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकणार आहेत. यातील दोन चित्रपटांचा अपवाद वगळला तर उर्वरित सर्व चित्रपटांतून नवीन चेहरे प्रेक्षकांसमोर येणार आहेत. दिग्दर्शकांची टीमही नवीन आहे. अर्थात प्रेक्षकांना यामुळे भरपूर पर्याय मिळणार असले तरी एकाच दिवशी इतके चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय काहींच्या अंगाशी येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

  'भाई - व्यक्ती की वल्ली' या बहुचर्चित चित्रपटाची सर्वाधिक चर्चा आहे. पहिला भाग आक्षेपांमुळे वादग्रस्त ठरल्यावर दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी डोळ्यात तेल घालून दुसरा भाग कसा बनवला असेल, याची परीक्षा प्रेक्षकही डोळ्यात तेल घालून करणार, यात शंका नाही. दुसरा प्रतीक्षेतील चित्रपट दिग्दर्शक संजय जाधव यांचा लकी या शीर्षकांतर्गत प्रदर्शित होत आहे. सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव ही परिचित नावे या चित्रपटातून भेटणार आहेत. रेडीमिक्स हा चित्रपट जालिंधर कुंभार यांनी दिग्दर्शित केला असून प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी, वैभव तत्त्ववादी यांच्या अभिनयाचे दर्शन घडवणारा आहे.

  धडपड : एक सर्वसामान्य मुलगा धडपड करून रॉकस्टार बनतो, अशी वन लायनर स्टोरी असणारा हा चित्रपट पवन बनसोडे यांनी दिग्दर्शित केला आहे. कॉमेडी आणि लव्हस्टोरी यांचे मिश्रण या चित्रपटात पाहायला मिळेल.
  प्रेमरंग : व्हॅलेंटाइन वीकच्या सुरुवातीलाच प्रेमरंग प्रदर्शित होत आहे. शरद गोरे दिग्दर्शित हा चित्रपट प्रेमाचे गुलाबी रंग उधळणार अशी लक्षणे आहेत. विनीता सोनवणे हा नवा चेहरा या चित्रपटातून दाखल होत आहे.
  प्रेमवारी : प्रेमाची व्याख्या करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला; पण नेमकी व्याख्या अजून सापडली नाही. प्रत्येक पिढीत असा प्रयत्न होतो, तीच परंपरा पुढे नेणारा हा चित्रपट चिन्मय उदगीरकर आणि मयूरी कापडणे अशी फ्रेश जोडी पेश करत आहे. दिग्दर्शन राजेंद्र गायकवाड यांचे आहे. 'उनाड वस्ती' हा चित्रपट उपेक्षितांचे अंतरंग दर्शवणारा असेल.
  नवे नट आणि दिग्दर्शक
  आसूड : शेतकऱ्यांच्या जगण्याच्या समस्या हा केंद्रबिंदू मानून दिग्दर्शक नीलेश अमळकर यांनी हा चित्रपट केला आहे.
  दहावी : शिक्षणाचे महत्त्व कायम असते, हे समजावून देणारा हा चित्रपट मयूर आणि पीयूष राऊत यांचा चित्रपट.

Trending