आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केनिया : समुद्रकिनारी गोळा केलेल्या 10,000 किलो प्लास्टिकपासून बनवली 9 मीटरची नाव 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैरोबी- केनियामध्ये समुद्रकिनाऱ्यावरून गोळा करण्यात आलेल्या कचऱ्यापासून ९ मीटरची बोट (नाव) तयार करण्यात आली आहे. यात सुमारे दहा हजार किलो प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. शिल्पकारांनी या नावेला सुमारे २० हजार रंगीत डब्यांपासून सजवले आहे. ही नाव २४ जानेवारीला ५०० किमीच्या प्रवासास निघून ७ फेब्रुवारीला लामूहून झांजीबारच्या बेटावर जाईल. समुद्र किनाऱ्यावर पसरलेल्या कचऱ्यापासून तयार केलेली पहिली नाव आहे. यूएन पर्यावरणाच्या अधिकारी जॉइस मौस्या यांनी नावेचे नाव फ्लिप फ्लॉपी असे ठेवल्याचे सांगितले. यात १८ लोक बसू शकतात. ती पूर्व आफ्रिकी किनाऱ्यावर ६ ठिकाणी थांबेल. 

 

दरवर्षी कचरा गोळा करते पथक
नाव तयार करणारे पथक दरवर्षी जगाच्या महासमुद्रात फेकलेला कचरा गोळा करते. यात पुन्हा वापरात असलेले सामान तयार करतात. 

 

९ देशांच्या मोहिमेवर स्वाक्षऱ्या
समुद्री प्रदूषण निपटण्यासाठी नऊ आफ्रिकी देशांनी आधीच मोहिमेवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या बोटीद्वारे लोकांना जागृत करण्यात येणार आहे. 

 

- 18 लोक कचऱ्यापासून बनलेल्या नावेत बसतात 
- 20 हजार रंगीत डब्यांनी सजवले आहे नावेला 
- 500 किमी प्रवासावर या महिन्यात निघेल 
 

बातम्या आणखी आहेत...