आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 लाखांसाठी 9 महिन्यांच्या गर्भवतीला तडपवून मारले, गर्भातील बाळाचाही झाला मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भटिंडा (पंजाब) - 2 लाख रुपये न दिल्याने सासरच्यांनी 9 महिन्यांच्या गर्भवतीला तडपवून जिवे मारले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. पोलिसांनी सासरच्या मंडळींवर कारवाई नाही केली म्हणून मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी सरकारी रुग्णालयापुढील राष्ट्रीय महामार्गावर मृतदेह ठेवून पोलिसांविरुद्ध 2 तास निदर्शने केली. यानंतर पोलिसांनी आंदोलनस्थळी पोहोचून तेथेच आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केली.

 

असे आहे प्रकरण

- बेअंत कौर (वय 30 वर्षे) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह हरजिंदर सिंहशी झाला होता.

- पोलिसांनी मृत विवाहितेचे मामा जसवीर यांच्या तक्रारीवरून पती, मोठा दीर राजू, जाऊ वीरपाल आणि सासू गुरमीतवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
- मृत बेअंतचे मामा म्हणाले, बेअंत कौरच्या लग्नात त्यांनी त्यांच्या कुवतीबाहेर जाऊन खर्च केला होता. काही दिवसांनीच सासरच्यांनी तिचा हुंड्यासाठी छळ सुरू केला, तिला मारहाण करू लागले. अनेकदा बैठका झाल्या, दोन्ही पक्षांमध्ये समझौताही झाला, पण पुन्हा काही दिवसांनी छळ सुरू झाला.

 

परिचिताने फोन करून सांगितले- बेअंत कौरचा मृत्यू झालाय..
- त्यांनी सांगितले, बेअंत कौरच्या लग्नाला 11 वर्षे उलटली. त्यांची भाची 9 महिन्यांची गर्भवती होती. काही दिवसांनीच तिची डिलिव्हरी होणार होती. तिला प्रसूतिवेदनाही सुरू झाल्या होत्या. 2 दिवसांपूर्वी त्यांचा भाचा गुरमीत हा बेअंतला भेटायला गेला होता. तेव्हा तिच्या पतीने म्हटले की, बेअंतची तब्येत ठीक नाहीये. 2 लाख रुपये द्याल तरच तिला हॉस्पिटलमध्ये नेऊ.

- मामाने असमर्थता व्यक्त केल्यावर आरोपींनी भाचीवर उपचार केले नाहीत. ते वेदनांनी तडफडून मेली.
- गुरुवारी पहाटे 3 वाजता एका परिचिताने फोन केला की, बेअंतचा मृत्यू झाला आहे. जेव्हा तो घटनास्थळावर गेले तेव्हा बेअंतच्या तोंडातून फेस निघत होता. असे वाटत होते की, तिला बेदम मारल्यानंतर विष देण्यात आले असावे. तिच्या पोटातला बाळाचाही मृत्यू झाला.

 

आरोपींवर गुन्हा दाखल
- पोलिसांनी साधारण कलम लावून कारवाई केली होती. यावर मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी हुंडाबळीची केस सांगत दुपारी 4 वाजता सरकारी रुग्णालयाबाहेर मृतदेह ठेवून चक्काजाम केला.

- एसएचओ इकबाल सिंह, स्टेशन इंचार्ज दविंदर सिंह यांनी आंदोलकांची समजूत घातली. आंदोलनस्थळीच त्यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी फरार झाले असून त्यांच्या अटकेसाठी छापेमारी केली जात आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...