आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका-पाकला चकवा देत घेतली Nuclear Test; अटल बिहारी वाजपेयी यांचे 9 मोठे निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आयुष्यात प्रत्येकालाच पर्यायांपैकी एक निवडण्याची संधी मिळते. आपण निवडलेला पर्याय आपल्या जीवनाची जीवनाची दिशा ठरवत असतो. आयुष्यातील हेच निर्णय माणसाला महापुरूष बनवतात. असेच एक महापुरुष अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या आयुष्यात घेतलेल्या सर्वात मोठ्या निर्णयांचा संग्रह आम्ही घेऊन आलो आहे. तीनदा देशाचे पंतप्रधान बनलेले अटल बिहारी वाजपेयी यांनी तब्बल 20 राजकीय पक्षांना एकत्रित आणून केंद्रात सरकारची स्थापना केली होती. ते भारतीय जनता पक्षाचे नेते असले तरीही प्रत्येक राजकीय पक्षाला ते आवडत होते. वाजपेयी यांनी असेही काही निर्णय घेतले ज्यांनी त्यांच्याच नव्हे, तर देशाची दिशा ठरवली. 

 
1. साऱ्या जगाला चकवा देऊन घेतली अणु चाचणी
1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारला 3 महिनेच पूर्ण झाले होते. त्यावेळी त्यांनी अणु चाचणी करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी राजस्थानच्या पोखरणमध्ये इंदिरा गांधी सरकारने 1974 मध्ये अणु चाचणी घेतली होती. परंतु, ती यशस्वी ठरली नव्हती. 11 आणि 13 मे 1998 रोजी पोखरणमध्ये पुन्हा अणु चाचणी करण्यात आली. त्यावेळी अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने भारतावर नजर ठेवण्यासाठी पोखरणवर एक सॅटेलाइट सुद्धा लावले होते. परंतु, भारताने या अमेरिकन सॅटेलाइटला चकवा देत अणु चाचणी घेतली. मिसाइल मॅन आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी त्या चाचणीची धुरा हाती घेतली होती. त्यांनीच चाचणी यशस्वी ठरल्याची घोषणा केली होती. त्याच दरम्यान अणुऊर्जेचा वापर फक्त विकासासाठी राहील. त्यातून शस्त्र बनवली जाणार नाहीत असे वाजपेयींनी स्पष्ट केले होते. 

 
2. देशाच्या 4 मोठ्या शहरांना एका नेटवर्कशी जोडले
अटल सरकारने 1999 मध्ये 'स्वर्णिम चतुर्भुज' योजनेची सुरुवात केली. योजनेचे काम 2001 मध्ये झाले होते. या मागचा हेतू दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता हायवे नेटवर्क जोडणे असे होते. ही योजना 2006 मध्ये पूर्ण होणार असा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, याचे काम 2012 मध्ये पूर्ण झाले. यामध्ये चारही शहरांना जोडण्यासाठी 5,846 किमी लांब असा हायवे बनवण्यात आला. यासाठी 600 अब्ज रुपये रुपये खर्च आला होता.

 
3. दिल्ली ते लाहोर बस सेवा
अटल बिहारी वाजपेयी यांनी नेहमीच भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. याची सुरुवात त्यांनी काँग्रेस विरोधी मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असतानाच केली. यानंतर वाजपेयींनी पंतप्रधान पदावर असताना ते लाहोर बस सेवा सुरू केली. या बस सेवेला 'सदा-ए-सरहद' नाव देण्यात आले. या सेवेचे उद्घाटन करताना वाजपेयी स्वतः त्या बसमध्ये बसून दिल्ली ते लाहोर गेले होते. 2001 मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतर ही सेवा बंद करण्यात आली. तसेच 2003 मध्ये ती पुन्हा सुरू करण्यात आली. 

 
4. 14 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार, सर्व शिक्षा अभियान
अटल सरकारमध्ये शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी 'सर्व शिक्षा अभियान' 2001 मध्ये सुरू करण्यात आले. यामध्ये 6 ते 14 वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा देण्यात आली. सोबतच, शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवण्यात आला. 

 
5. चंद्रावर भारताच्या अस्तित्वाची मोहिम
15 ऑगस्ट 2003 ला लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना वाजपेयींनी 'चंद्रयान 1' ची घोषणा केली होती. चंद्रयान 1 भारताचे पहिले मून मिशन होते. ही मोहिम 22 ऑक्टोबर 2008 रोजी श्रीहरिकोटा येथून लाँच करण्यात आली. याचा हेतू चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किमी उंचीवरून चंद्राचे रिंगण घालणे आणि त्याची आकडेवारी गोळा करणे होते. 

 
6. कारगिल युद्धात पाकिस्तानला धूळ चारली
पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेज मुशर्रफांनी भारत-पाकिस्तानची नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या जमीनीवर ताबा मिळवला. यावरूनच अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी फोनवर संवाद साधला. तसेच आपल्याला युद्ध नको असेही समजावून सांगितले. तरीही पाकिस्तानने वाजपेयींच्या बोलण्यावर दुर्लक्ष केली. त्यामुळेच, भारत आणि पाकिस्तानात कारगिल येथे युद्ध पेटले. या युद्धात भारताला मोठे नुकसान झाले. भारताचे 527 जवान शहीद झाले. तरीही 26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराला कारगिल युद्धात पराभूत केले. 


7. त्यांच्या धोरणांमुळे देशात संचार क्रांती
अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना दूरसंचार धोरणांमध्ये बदल करून संचार क्रांती आणली. त्यांच्या सरकारने टेलीकॉम कंपन्यांना असलेली फिक्स्ड लायसेन्स फी रद्द केली. तसेच त्या ठिकाणी रेव्हेन्यू शेअरिंग यंत्रणा अंमलात आणली. अटल सरकारमध्येच 15 सप्टेंबर 2000 रोजी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ची स्थापना झाली. सोबतच टेलीकॉम सेक्टरमध्ये होणारे वाद सोडवण्यासाठी 29 मे 2000 रोजी टेलीकॉम डिस्प्यूट सेटलमेंट अपीलेट ट्रिब्यूनल (TDSAT) ची स्थापना केली. 

 
8. लोकांच्या जीवासाठी दहशतवाद्यांना सोडले
24 डिसेंबर 1999 रोजी नेपाळच्या त्रिभुवन विमानतळावरून इंडियन एयरलाइन्सचे विमान IC-814 ने दिल्लीसाठी उड्डान घेतले. परंतु, हे विमान दहशतवाद्यांनी हायजॅक केले. विमान दिल्लीला उतरणार होते, परंतु दहशतवाद्यांनी ते लाहोर, अमृतसर आणि दुबईनंतर शेवटी अफगाणिस्तानच्या कंधारला नेले. विमानात 176 प्रवाशी आणि 15 क्रू मेंबर्स होते. दहशतवाद्यांनी त्यांना सोडण्यासाठी भारतात कैद असलेल्या दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी केली. 8 दिवस चाललेल्या या चर्चेनंतर अटल सरकार दहशतवाद्यांपुढे नमले. यानंतर तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांनी स्वतः जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर, अहमद जरगर आणि शेख अहमद उमर सईद यांची सुटका केली. अटल सरकारच्या निर्णयावर खूप टीका झाली होती. 

 

9. नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय
1998 मध्ये भाजपने गुजरातमध्ये बहुमत मिळवत सरकार स्थापित केले. यानंतर केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्री करण्यात आले. 2001 च्या गुजरात भूकंपानंतर केशुभाई पटेल सरकारने परिस्थिती हाताळली नाही. जनता त्यावर नाराज होती. यानंतर केशुभाई पटेल यांनी आरोग्याचे कारण देत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ऑक्टोबर 2001 मध्ये नरेंद्र मोदी एका अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी दिल्लीत होते. त्याचवेळी अटल बिहारी वाजपेयींनी त्यांना भेटण्यासाठी बोलावून घेतले. वाजपेयींची भेट घेतल्यानंतर मोदी वेळीच गुजरातला रवाना झाले आणि तेथे मुख्यमंत्री पद भूषविले. नरेंद्र मोदी 2002, 2007 आणि 2012 मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. 2014 मध्ये त्यांची पंतप्रधान पदासाठी निवड करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...