आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • 9 Out Of Every 10 Women In The World Are Discriminated Against; In Pakistan, It Is 99 Percent, In India It Is 98 Percent

जगात प्रत्येकी १० पैकी ९ महिलांसाेबत केला जातो भेदभाव; पाकिस्तानात असे वागणारे ९९ टक्के, भारतात ९८ टक्के प्रमाण

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • संयुक्त राष्ट्राने महिलांच्या स्थितीचा आढावा घेत पहिल्यांदाच बनवला जेंडर साेशल नाॅर्म्स इंडेक्स
  • घरगुती कामाचे वेतन असते तर गेल्या वर्षी ७७४ लाख काेटी कमावले असते

वाॅशिंग्टन - लैंगिक समानतेच्या क्षेत्रात अनेक सुधारणांनंतर आजही सुमारे ९० टक्के लाेक महिलांविषयी भेदभाव किंवा पूर्वग्रह बाळगतात. २८ टक्के लाेकांनी पत्नीला मारहाण करण्यात काहीही गैर नसल्याचे नमूद केले आहे. त्यात महिलाही आहेत. पुरुष श्रेष्ठ राज्यकर्ते हाेऊ शकतात, असे निम्म्याहून जास्त लाेकांना वाटते. ४० टक्के लाेकांच्या दृष्टीने पुुरुष उत्कृष्ट व्यावसायिक असतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेची गती मंद हाेते. तेव्हा अशा प्रकारच्या नाेकऱ्या पुरुषांना दिल्या पाहिजेत. ते यातून मार्ग काढू शकतात, असे त्यांना वाटते. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत (यूएनडीपी) आपल्या पातळीवर जेंडर साेशल नाॅर्म्स इंडेक्समधून हे वास्तव उजेडात आले आहे. जगभरातील ८० टक्के लाेकसंख्या असलेल्या ७५ देशांतील अध्ययनाच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. ३० देशांत महिलांबद्दलची विचार करण्याची पद्धत बदलली आहे. संयुक्त राष्ट्रातील मानवी विकास विभागाचे प्रमुख पॅड्राे काॅन्सिकाआे म्हणाले, शाळेत मुलींची संख्या मुलांच्या बराेबरीने आली आहे. १९९० नंतर प्रसूतीत मृत्यूची संख्या ४५ टक्क्यांनी घटली आहे. असे असले तरी लिंगविषयक भेदभाव कायम आहेत. त्यातही सत्ताकेंद्र असलेल्या प्रत्येक पदावर हा भेदभाव दिसून येताे. अशा ठिकाणी अनेकदा समान काम असूनही पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी वेतन दिले जाते. वरिष्ठ पदांवर जाण्याची संधीही कमी मिळते. यूएनडीपीच्या म्हणण्यानुसार पुरुष व महिला एकाच प्रकारे मतदान करतात. परंतु, जगात केवळ २४ टक्के संसदीय जागांवर महिलांची निवड झाल्याचे दिसते. १९३ पैकी केवळ १० देशांत सत्तेच्या प्रमुख पदावर महिला आहेत. पुरुषांच्या तुलनेत त्या सर्वात जास्त काम करतात. परंतु, जास्त केलेल्या कामाचा माेबदलाही त्यांना दिला जात नाही.  घरगुती कामाचे वेतन असते तर गेल्या वर्षी ७७४ लाख काेटी कमावले असते


आॅक्सफॅमच्या मते महिला लहान मुलांची देखभाल, स्वयंपाक करणे व घरातील इतर अनेक काम करतात. या कामांसाठी त्यांना किमान वेतन दिले गेले असते तर त्या सर्वांनी मिळून गेल्या वर्षी किमान ७७४ लाख काेटी रुपये कमावले असते. ही रक्कम फाॅर्च्युन-५०० मध्ये सहभागी जगातील सर्वात माेठ्या ५० कंपन्यांच्या कमाईची बराेबरी ठरली असती. त्यात अॅपल, वाॅलमार्ट, गुगलसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. 
 

या देशांत सर्वाधिक भेदभाव 
 
पाकिस्तान : 99.81%

कतर : 99.33%

नायजेरिया : 99.33%


मलेशिया : 98.54%

इराण : 98.54%

भारत : 98.28%