आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किराडी परिसरात मध्यरात्री कपडा गोदामाला भीषण आग; होरपळून 9 जणांचा मृत्यू, महिन्याभरातील दुसरी मोठी घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 8 डिसेंबरला अनाज मंडीमधील एका फॅकट्रीमध्ये आग लागली होती, होरपळून 43 जणांचा मृत्यू झाला होता

नवी दिल्ली- दिल्लीतील किराडी परिसरात मध्यरात्री 12.30 वाजता कपडा गोदामाला भीषण आग लागली. या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थील दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

महिन्यातील दुसरी घटना
 
यापूर्वीही याच महिन्यात 8 डिसेंबरला दिल्लीतील अनाज मंडीच्या रहिवासी परिसरातील फॅक्टरीमध्ये भीषण आग लागली होती. या आगीत 43 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यापूर्वी दिल्लीतील मुंडका बागात एका प्लायवूडच्या फॅक्टरीला आग लागली होती. तसेच शालीमार बाग येथेही आग लागली होती. या आगीत 3 महिलांचा धुराने श्वास कोंडून मृत्यू झाला होता.