जायकवाडीत 9% पाणीसाठा; / जायकवाडीत 9% पाणीसाठा; रब्बीला दुसरे पाणी आवर्तन; पाणी मराठवाड्याला उन्हाळ्याच्या चार महिने पुरण्याची शक्यता नाही  

प्रतिनिधी

Feb 19,2019 06:14:00 AM IST

पैठण- जायकवाडी धरणाचा पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून सध्या केवळ ९ टक्के पाणीसाठा जायकवाडी धरणात शिल्लक राहिला आहे. हे पाणी मराठवाड्याला उन्हाळ्याच्या चार महिने पुरण्याची शक्यता नसून सध्या डाव्या कालव्यातून रब्बीचे दुसरे आवर्तन सुरू असल्याने तो साठा या महिनाभरात ७ टक्क्यांवर येईल. वीस दिवसांनी मात्र मृत साठ्यातूनच पाणी उपसा करावा लागणार असल्याचे कार्यकारी अभियंता आर.बी.काळे यांनी सांगितले.

धरणावर औरंगाबाद, जालन्यासह ४ हजार उद्योग, नगर जिल्ह्यातील अनेक भागाला पाणी पुरवठा होतो. पाण्याचे नियोजन होत नसल्याने जायकवाडी धरणातील पाणी सिंचनाला गरज नसताना जालना जिल्ह्यातील एका बड्या पुढाऱ्याच्या दबावाने जास्त पाणी खरीप हंगामाच्या नावाखाली दिले. यातच धरणाचा साठा १७ टक्क्यांवर आला आता पुन्हा रब्बीला दोन पाणी पाळीचे अचानक नियोजन ठरले. यात एका पाणी पाळीत साधारणपणे सात दिवसाचे अंतर ठेवले जाते. मात्र ते न करता सलग दुसरी पाणी पाळी सुरू ठेवल्याने या पाण्याचा उपयोगापेक्षा ते वाया जास्त जाणार आहे. खरीप हंगामाला सलग पाणी पाळी जायकवाडीच्या डाव्या व उजव्या या दोन्ही कालव्यातून मिळाल्याने धरण पट्ट्यातील पिके तरली होती.

X
COMMENT