आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशाच्या हव्यासापाई त्याने अपहरणानंतर 9 वर्षांच्या मुलाची केली निर्घृण हत्या, चाकूने शरिरावर केले 8 वार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड - छत्तीसगडमध्ये 30 वर्षांच्या शिव प्रजापतीने रायगड येथील 9 वर्षांचा मुलगा योग प्रकाशचे अपहरण करून त्याची हत्या केली. खंडणीचे 25 हजार रुपये मिळाले नाबी म्हणून त्याने ही हत्या केली. आरोपीने मुलाला साडीने बांधून त्याच्या छातीवर आणि पाठीवर चाकूने 8 वार करत त्याला ठार केले. त्याने घरापासून जवळपास 1 किमी लांब जाऊन ही हत्या केली. मुलाची हत्या केल्यानंतर स्वतः गावकऱ्यांबरोबर मुलाला शोधण्याचे नाटक करत राहिला. 


आरोपीही करत होता मुलाला शोधण्याचे नाटक, पण असा आला संशय 
प्रजापतीने खंडणीची मागणी करण्यासाठी ज्या नंबरवरून फोन केला होता, त्याला ट्रेस करत पोलिसांनी त्याला पकडले. सोमवारी सकाळीच प्रजापतीने दाखवलेल्या ठिकाणी मुलाचा मृतदेह आढळला. प्रजापती मुलाच्या वडिलांनाच वारंवार किडनॅपरचा नंबर विचार होता. पण मुलाला शोधण्यात सगळे व्यस्त असल्याने कोणाचे त्याकडे लक्ष गेले नाही. प्रजापती 4 वर्षांपासून गावात विटा बनवण्याचे काम करायचा. गावात राहत असल्याने त्याच्याकडे योग प्रकाश आणि इतर मुलांचे येणेजाणे होते. त्यामुळेच तोही मुलाला शोधत होता तरी कोणाला त्यावर संशय आला नाही. 


अशी केली हत्या पोलिसांनी सांगितले की, प्रजापती दुर्गा देवीच्या मंडपाबाहेर मुलाचे अपहरण केले. त्यानंतर तो मुलाला निर्जन स्थळी घेऊन गेला. त्याने त्याला साडीने बांधले. पण गावकरी त्याला शोधायला निघाले तेव्हा प्रजापती घाबरला. नंतर तो मुलाला 1 किलोमीटर लांब घेऊन गेला आणि चाकूने वार करत त्याची हत्या केली. फोन नंबरवरून पोलिसांनी त्याला शोधले. हत्येचे दुसरे काही कारण असल्याचा संशय असल्याने पोलिस तपास करत आहेत. 


रात्री 7:45 वाजता आला कॉल
मुलाचे वडील म्हणाले, रविवारी रात्री 7:30 वाजता मी मुलगा योग प्रकाश, विवेक (14), पत्नी कमलाबाई, सून आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह दुर्गा पुजेसाठी गेलो होतो. त्याठिकाणी प्रसाद वाटण्यात मी व्यस्त होतो. कुटुंबातील सर्वजण घरी आले, पण योग प्रकाश आला नाही. त्यानंतर 7.45 वाजता खंडणीसाठी फोन आला. 

बातम्या आणखी आहेत...