Home | National | Other State | 9 year old misplaced from grandfathers house dead body found after 5 days

आजोबाच्या घरी आली होती मुलगी, खेळता-खेळता घरासमोरून झाली बेपत्ता, 5 दिवसांनंतर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडला तिचा मृतदेह

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 14, 2019, 12:48 PM IST

6 दिवसांपूर्वी आली होती आजोबाच्या घरी, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची कुटुंबीयांची मागणी

  • 9 year old misplaced from grandfathers house dead body found after 5 days

    करनाल (हरियाणा) - शनिवारी येथील घीड गावात कचऱ्याचा ढिगाऱ्यात 9 वर्षीय मुलीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला. मुलगी गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता होती. पोलिसांनी मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. सध्या कुटुंबीयांनी कोणावरही आरोप केला नाही. पोलिस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


    मिळालेल्या माहितीनुसार मुलगी 6 दिवसांपूर्वी घीड येथे आपल्या आजोबाच्या घरी आली होती. ती घराबाहेर मुलांसोबत खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी पाच दिवसांपूर्वी कुंजपुरा पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली होती. शनिवारी मुलीचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्धनग्न अवस्थेत सापडला.


    पोलिसांनी मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी कल्पना मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपींनी लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी कुटुंबीयांनी मागणी केली आहे.

Trending