आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • 9 year old Preeti Bhattacharjee Becomes Winner, Wants To Use Winning Prize Rs 15 Lac For Mother And Grandmother

9 वर्षांची प्रीती भट्टाचार्जी बनली विनर, जिंकलेल्या 15 लाख रुपयांतून पूर्ण करू इच्छिते आजी - आईचे स्वप्न 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : कोलकाताची प्रीती भट्टाचार्जीने 'सुपर स्टार सिंगर' च्या पहिल्या सीजनचा विजय आपल्या नवी केला आहे. रविवारी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये 9 वर्षांची प्रीती इतर पाच फायनलिस्ट मौली, स्नेहा शंकर, हर्षित नाथ, अंकोना मुखर्जी आणि निष्ठा शर्मा यांना मागे टाकून विनर बनली आहे. तिला सुपरस्टार सिंगरच्या ट्रॉफीसोबत 15 लाख रुपये प्राइज मनीच्या स्वरूपात दिले गेले. प्रितीने सांगितल्या प्रमाणे ती जिंकलेली रक्कम आजी आणि आई यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. 

आजीचे मुंबईमध्ये राहण्याचे स्वप्न पूर्ण करू इच्छिते... 
सर्वात आधी मी जिंकलेली ट्रॉफी आपल्या आजीला देईन. ती खूप खुश होईल. याव्यतिरिक्त जिंकलेल्या रकमेतून आजी आणि आईचे स्वप्न पूर्ण कारेन. आजीची इच्छा आहे की, मुंबईमध्ये मॅच एक फ्लॅट असावा. तिच्यासोबत आता माझेही स्वप्न बनले आहे. माझी इच आहे की, आजीला तिच्या आयुष्यातील काही वर्षे मुंबईमध्ये घालवता यावी. दुसरीकडे माझी आई मला खूप मोठी प्लेबॅक सिंगर बनवू इच्छिते. तिची इच्छा आहे की, मी जगभरात नाव कमवावे. मी जिंकलेल्या रकमेतील काही भाग प्रोफेशनल सिंगिंग शिकण्यासाठी वापरेन.  

कधीच वाटले नव्हते मी या शोमध्ये एवढ्या लांबपर्यंत येईल... 
मला कधीच नव्हते चाटले की, या शोमध्ये एवढ्या लांबचा प्रवास कारेन. शेवटी माझा विजय होईल. मी या शोसही खूप मेहनत केली होती. कोलकातामध्ये जेव्हा ऑडिशन होत होते तेव्हा मला वाटले नव्हते की, माझे सिलेक्शन होईल. आणि मी मुंबईला येईन. मुंबईमध्ये ऑडिशन देताना थोडी भीती वाटत होती. पण मी हा राउंडदेखील पार केला. बस इथूनच या शोमधील माझी जर्नी सुरु झाली.  

'सर्व कमेंट्स लक्षात ठेवेन...'
या शोमधील अनुभव खूप वेगळा होता. मला गाण्याची आवड आहे. आईसोबत गुणगुणताना एवढ्या मोठ्या मंचावर एवढ्या लोकांसमोर गाण्याचा अनुभव खूप मजेदार होता. हे मी शबदात व्यक्त करू शकत नाही. शोमध्ये ज्या कमेंट्स मिळत होत्या. त्या मला मोटिवेट करत होत्या. या कमेंट्स माझ्यासाठी खूप विशेष आहेत आणि मी नेहमी त्या लक्षात ठेवेन.  

दीपिका पदुकोणसाठी गाणे गाऊ इच्छिते. 
मला श्रेया घोषाल खूप आवडते. त्यांचा आवाज खूप मधुर आहे. माझेस्वप्न आहे की, मला त्यांच्यासोबत गाणे गाण्याची एकदा संधी मिळावी. सोबतच मला दीपिका पदुकोणदेखील खूप आवडते. जेव्हा मी मोठी होईन तेव्हा मला तिच्यासाठी गायला खूप आवडेल.