आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतापर्यंत 90 प्रकरणे : बंगळुरूमध्ये कर्मचारी संशयित आढळल्यामुळे इन्फोसिसने ऑफिस रिकामे केले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णानाची संख्या 90 झाली आहे. 13 राज्यांमध्ये संक्रमण पसरले आहे. महाराष्ट्र आणि यूपीमध्ये दोन-दोन  नवी प्रकरणे समोर आली आहेत. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यानुसार, आतापर्यंत एकूण 19 लोक संक्रमित आढळले आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये पिता आणि मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. याची पुष्टी गाझियाबाद जिल्हा प्रशासनाने शनिवारी केली. तेलंगणामध्येही एक प्रकरण समोर आले आहे. इन्फोसिसने बंगळुरू येथील आपले सॅटेलाईट ऑफिस पुढच्या आदेशापर्यंत बंद केले गेले आहे. कंपनीचे काही कर्मचारी एका संशयित रुग्णाच्या संपर्कात आले होते. इटलीमध्ये फसलेल्या 21 भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे विमान शनिवारी सकाळी कोच्चि एअरपोर्टवर पोहोचले. सर्व लोकांना तपासासाठी अलुवा रुग्णालयात दाखल केले गेले आहे. भारत सरकारने परदेशातून येणाऱ्या सर्व यात्रेकरूंसोबत हेल्थ सर्टिफिकेट आवश्यक केले आहे. सर्टिफिकेट नसल्यामुळे 300 पेक्षा जास्त भारतीय नागरिक इटलीमध्ये फसले होते. ज्यांना परत आणण्याचे काम सुरु झाले आहे. परराष्ट्र मंत्रालयानुसार, रविवारीदेखील काही प्रवासी आणले जाणार आहे.   
अपडेट्स... 

  • परिस्थितीचा सामना करण्यासाठी मध्यप्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशसह 13 राज्यांमध्ये शाळा-कॉलेज बंद केले गेले आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे 3 एप्रिलपर्यंत चालणारे सत्रदेखील 18 मार्चला स्थगित होऊ शकते. तीन खासदारांनी पीएम यांना पत्र पात्र लिहून सत्र समाप्त करण्याची विनंती केली. सुप्रीम कोर्टाने सध्या गरजेच्या केसचीच सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • सिद्धी विनायक मंदिर ट्रस्टनेदेखील भाविकांना मंदिरात प्रवेशपूर्वी हॅन्ड सॅनिटायझर देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ने बंगळुरूमध्ये होणारी आपली अखिल भारतीय प्रतिनिधि सभा स्थगित केली गेली आहे.
  • तिहार तुरुंग प्रशासनाने सर्व कैद्यांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. तुरुंगातच आयसोलेशन वॉर्ड बनवला गेला आहे. येथे कोरोनाची लक्षण असलेले कैदी ठेवले जाणार आहेत. सध्या येथे 17500 कैदी आहेत.
  • नागपुरच्या मेयो रुग्णालयातून कोरोना व्हायरसची ४ संशयित रुग्ण पळून गेले आहेत. यामध्ये 1 चा रिपोर्ट निगेटिव्ह होता तर इतर ३ जणांचे रिपोर्ट यायचे आहेत. पोलिस सध्या सर्वांचा तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...