आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेटरच्या मोजे-बुटात व जीन्स पँटमध्ये ९० लाखांचे सोने, सुरत विमानतळावर पकडला तस्कर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत - संयुक्त अरब अमिरात (यूएई)तून गुजरातच्या सुरत विमानतळावर उतरलेल्या एका वेटरकडे ९० लाखांचे सोने सापडले. पोलिसांनी सांगितले, तरुणाची ओळख जिग्नेश पटेल अशी झाली आहे. त्याच्याकडील २४ कॅरेट सोन्याची १९ बिस्किटे व दोन ब्रेसलेट जप्त करण्यात आली आहेत. याची किंमत ९० लाख रुपये आहेत. त्याने हे सोने पायमोजे व बूट व जिन्स पँटमध्ये ठेवले होते.  आरोपी एअर इंडिया एक्सप्रेसच्या इंटरनॅशनल विमानाने तो सुरतला आला. तेथे अबकारी विभागाच्या जाळ्यात सापडला. आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले, तो वलसाडचा रहिवाशी आहे. दुबईत एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिग्नेशला दुबईत एक व्यक्ती भेटली. त्याला सुरतला सोने पोहचविण्यासाठी एक लाख रुपये कमीशनपोटी देण्याचे ठरले. एक लाखांच्या लालचेपोटी त्याने तस्करी केली होती
 

बातम्या आणखी आहेत...