आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

90% स्टार्टअप का पडतात बंद; जाणून घ्या स्टार्टअप्स फेल होण्यामागची 10 मुख्य कारणे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - यश हे सर्वांनाच दिसते पण अपयश मात्र अंधारात कुठेतरी हरवून जाते. ही बाब स्टार्टअपच्या बाबतीत लागू पडते. कारण आकडे दर्शवतात की, 90 टक्के स्टार्टअप्स अपयशी होऊन बंद पडत आहेत. 10 मधील फक्त एकच स्टार्टअप असा असतो ज्याला यशस्वी म्हणू शकतो. अशातच प्रश्न उपस्थित राहतो की, बहुतेक स्टार्टअप का अपयशी होतात? 

 

> याचे सर्वात मोठे कारण आहे स्टार्टअप सुरू करण्याआधी वास्तविक परिस्थितींचा अचूकपणे न लावलेला अंदाज. असे म्हटले जाते की, कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याबद्दलच्या सर्व चांगल्या गोष्टी माहिती असतात. पण, व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यातील आव्हाने आणि कमतरतेची जाणीव होते. स्टार्टअप विषयी आशावाद ठेवणे चांगले आहे कारण त्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. पण सुरूवातील अपयशाला समोरे जाण्याची तयारी हवी. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही धीर सोडायला पाहिजे. याचा अर्थ असा आहे की, तुम्ही स्मार्ट पद्धतीने आणखी परिश्रम करण्यासाठी तयार व्हावे. 

 

फॉर्च्यून मॅगझीनच्या एका रिपोर्टमध्ये स्टार्टअप अपयशी होण्यामागे विस्ताराने सांगितले आहे. फॉर्च्यूनच्या मते स्टार्टअप बंद होण्यामागे अशाप्रकारची 10 मुख्य कारणे आहेत. 

> 1. आपण जे बनवत आहात त्याला खरेदी करण्याची कोणाची इच्छा नाही (42%) 
> 2. पैशाची कमतरता (29%)
> 3. टीममधील समन्वयाचा अभाव (23%)
> 4. स्पर्धेमध्ये न टिकणे (19%)
> 5. किंमती किंवा किंमतीशी संबंधीत समस्या (18%)
> 6. गुणवत्तेची कमतरता (17%)
> 7. बिझनेस मॉडलचा अभाव (17%)
> 8. कमकुवत मार्केटिंगची  (14%)
> 9. ग्राहकांना दुर्लक्षित करणे (14%)
> 10. वेळेच्या नियोजनाची कमतरता (13%)

 

या कारणांवरून लक्षात येते की, उद्योजकांनी कोणत्याही गोष्टीला दुर्लक्षित करू नये. 'होईल, करता येईल' असा दृष्टीकोन स्टार्टअपसाठी चांगला नाही. एक उत्कृष्ठ बिझनेस मॉडेल आणि त्यावर कठोर शिस्तीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

 

बातम्या आणखी आहेत...