आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 90 Year Old Mother Tied And Left In Cold By Her Two Son In UP, SDM Sent Them To Jail

90 वर्षांच्या आईवर नाही आली दया, कडाक्याच्या थंडीत हात-पाय बांधून घराबाहेर सोडले, कानातून आले रक्त...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्नाव(उत्तर प्रदेश)- गावातील एका 90 वर्षांच्या आईला हात-पाय बांधून कडाक्याच्या थंडीत घराबाहेर सोडले. हैराण करणारी बाब म्हणजे हे निर्दयी कृत्य त्या महिलेच्या दोन मुलांनीच केले आहे. त्या थंडीत कु़डकू़डणाऱ्या महिलेवर एसडीएमचे लक्ष गेले तेव्हा त्यांनी तिला सोडवले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलवून हे कृत्य करणाऱ्या मुलांना अटक करायला लावली.


काय आहे प्रकरण ?
- एसडीएम पूजा अग्निहोत्री शुक्रवारी संध्याकाळी अजगॅन पिरसरातील जमुका गावतील मजरा कुईथर परिसरात चार पिडीत कुटंबांना भेटायला गेल्या होत्या. तेथून वापस येताना थंडीत कुडकूडणाऱ्या त्या महिलेवर त्यांचे नजर पडली. त्या महिलेच्या जवळ गेल्या तेव्हा त्यांना दिसले की, महिलेला दोरीने बांधून ठेवले होते.

 

- यावर त्यांनी स्थांनीकांना विचारले तेव्हा त्या महिलेचे नाव कलावती आहे कळाले. महिलेला मानसिक आजार असल्यामुळे त्या महिलेने स्वत:ला सोडवायचा प्रयत्नही केला नाही, आणि त्यांच्या कानातून रक्तही वाहत होते.


महिलेच्या मुलांनी काया सांगितले?
प्रकरणावर एसडीएमने विचारल्यावर महिलेची मुले पुत्तीलाल आणि संतोष लोधीने सांगितले की, त्यांच्या आईला मानसिक आजार आहे. त्या कुठेही निघूण जातात. त्यावर एसडीएमने त्यांना खुप सुनावले की, यावर उपचार करण्याऐवजी तुम्ही त्यांना थंडीत बाहेर बसवता.


एसडीएमने पाठवले तुरूंगात
मुलांचे म्हणने ऐकुण एसडीएम यांना राग आला. त्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून मुलांविरोधात तक्रार दाखल केली आणि त्यांना तुरूंगात पाठवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...