Home | National | Other State | 90 year old starts breathing before his last rites ceremony

अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती..मुलांनी मुंडनही करुन घेतले होते.. 'तो' अचानक उठून बसला अन् सगळ्यांशी बोलू लागलाऽऽ

दिव्यमराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 01:00 PM IST

बुधराम यांचे पार्थिव सरणावर ठेवणार तितक्यात त्यांचा श्वास सुरु झाला. ते पुन्हा जिवंत झाले.

  • 90 year old starts breathing before his last rites ceremony

    झुंझुनू - एका कुटुंबात वृद्ध व्यक्तीचे निधन होते. नातेवाईक त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करतात. तिरडी सजविण्यात येते. सरण रचले जाते. परंतु अचानक मृत व्यक्तीचा श्वास सुरु होते. व्यक्ती चक्क सरणावरून उठतो आणि नातेवाईकांसोबत बोलू लागतो. शोककळा पसरल्या घरात चक्क मिठाई वाटली जाते. राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात घडलेल्या या अनोखी घटनेची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

    सरणावर ठेवणार तितक्यात वृद्ध पुन्हा जिवंत होतो...

    > झुंझुनूं जिल्ह्यात राहणारे बुधराम गुर्जर (95) यांची प्रकृती खाल्यावल्यानंतर त्याचे श्वास बंद झाला. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. मुलांनी मुंडणही करून घेतले.
    > बुधराम यांचे पार्थिव सरणावर ठेवणार तितक्यात त्यांचा श्वास सुरु झाला. ते पुन्हा जिवंत झाले. एवढेच नाही तर ते नातेवाईकांशी संवाद साधू लागले. हा चमत्कार पाहून संपूर्ण जिल्ह्यात बुधराम यांच्यासंदर्भात एकच चर्चा सुरु झाली आहे.

Trending