आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरातमध्ये एका दिवसात 900 दारूडे पकडले, ठेवण्यासाठी पोलिस ठाणे अपुरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- हे छायाचित्र गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील आहे. येथे सोमवारी नववर्षाच्या निमित्ताने दारू ढोसणाऱ्या ६०० दारूड्यांना पोलिसांनी पकडले. पारडी पोलिस ठाण्यात त्यांना ठेवण्यासाठी जागा शिल्लक उरली नाही. त्यांना कसेबसे कोंबण्यात आले होते. मंगळवारी शाळेच्या बसमधून त्यांना पाठवावे लागले. सोमवारी गुजरातमध्ये पोलिसांनी ९०० लोकांना अटक केली होती. गुजरातमध्ये दारूबंदी असूनही लोक नशेत रस्त्यावर फिरत होते.