Home | Maharashtra | Mumbai | 907 bollywood actors support narendra modi

देशातील नऊशेवर कलाकार भाजपच्या समर्थनात मैदानात, शंकर महादेवन, राम सुतार, वामन केंद्रेंचा समावेश

प्रतिनिधी | Update - Apr 11, 2019, 12:21 PM IST

साहित्य क्षेत्रातील 100 पेक्षा जास्त कलाकारांनी भाजपला मतदान न करण्याच्या आवाहन नुकतेच केलेले असताना आता तब्बल 907 कलाका

  • 907 bollywood actors support narendra modi

    मुंबई - साहित्य क्षेत्रातील १०० पेक्षा जास्त कलाकारांनी भाजपला मतदान न करण्याच्या आवाहन नुकतेच केलेले असताना आता तब्बल ९०७ कलाकार भाजपच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. पूर्वाग्रह आणि दबावमुक्त राहून नवे सरकार निवडा. मागील ५ वर्षांत देशाने विकासाभिमूख सरकार पाहिली. त्यामुळे जगभरात देशाचे नाव झाले. आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वातील सरकार निवडून देण्याची आपली जबाबदारी असल्याचे आवाहन या कलाकारांनी केले आहे. यात प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, मुर्तीकार राम सुतार, राष्ट्रीय नाट्यसंस्थेचे माजी अध्यक्ष वामन केंद्रे, गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच महेश एलकुंचवार, भालचंद्र नेमाडेंसह अनेक दिग्गज साहित्यिकांनी भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले होते.


    भाजप समर्थनार्थ पुढे आलेले कलाकार
    पंडीत जसराज, उस्ताद गुलाम मुस्तफा खान, राम सुतार, पंडीत डेबू चौधरी, सराेज वैद्यनाथन, रिता गांगुली, राहुल रॉय, अनंत महादेवन, पल्लवी जोशी, हंस राज हंस, विवेक ओबेरॉय, विजय पाटकर, मनोज जोशी, सुष्मिता मुखर्जी, अभिजीत भट्टाचार्य, गजेंद्र चौहाण, पंंकज धीर, सुदेश बेरी, रवींद्र साठे, रवीशंकर प्रसाद, मुकेश खन्ना, मृदूला राजवाडे, प्रवीण झा, मनोज गोयल, राजेश शर्मा, विपूल जैन, मालिनी अवस्थी, विदुशी भारती शिवाजी, गीताचंद्रन, बिमा पटेल, निलम जॉय मुखर्जी, कुमार मोहन, मदन जैन आदींचा यामध्ये समावेश आहे. आता यावरूनही राजकारण होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

Trending