आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

90 च्या दशकातील प्रसिद्ध गायक नितिन बालींचे अपघातात निधन, डोक्याला झाली होती गंभीर इजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 90 च्या दशकातील प्रसिद्ध गायक नितीन बाली यांचे अपघातामुळे निधन झाले आहे. बोरिवलीहून मालाच्या घरी येताना नितीन बाली यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची गाडी डिव्हायडरवर आदळली होती. त्यामुळे डोक्याला झालेल्या इंटर्नल इंज्युरीमुळे त्यांचे निधन झाले. 


डॉक्टरांनी उपचार करून घरी पाठवले, पण नंतर..
अपघातानंतर तेस्वतः गाडी चालवत हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यानंतर आरामासाठी त्यांनी घरी पाठवण्यात आले. पण घरी पोहोचल्यानंतर बाली यांनी रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. काही मिनिटांनी त्यांचे ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट ड्रॉप झाला. त्यामुळे ते जमिनीवर कोसळले. त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

 

नितीन बाली यांची 90 च्या दशकामध्ये अनेक प्रसिद्ध रिमिक्स गाणी हिट झाली होती. नीले नीले अंबर पर, एक अजनबी हसिना से, पल पल दिल के पास अशा गाण्यांचा त्यात समावेश होता. 1998 मध्ये ना जाने या अल्बमद्वारे त्यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण केले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...