Home | International | Other Country | 9/11 anniversary rare images of world trade center attack that killed 2997

​9/11च्या हल्ल्याची 17 वर्षे : अमेरिकेत झालेल्या या विनाशकारी हल्ल्याचे UNSEEN PHOTOS, मृत्यूमुखी पडले होते 2,997 लोक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 11, 2018, 12:18 AM IST

आज 11 सप्टेंबर आहे. याच तारखेला 17 वर्षांपूर्वी अमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता.

 • 9/11 anniversary rare images of world trade center attack that killed 2997

  नॅशनल डेस्क : आज 11 सप्टेंबर आहे. याच तारखेला 17 वर्षांपूर्वी अमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. असा हल्ला होऊ शकतो अशी कल्पनाही या देशाने केले नव्हती. 11 सप्टेंबर 2001 रोजी जगातील सर्वात शक्तिशाली देशावर हल्ला झाला. या हल्ल्याने फक्त अमेरिकेला नव्हे, तर पूर्ण जगाला हादरवून सोडले. आज अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर, पेंटागन आणि पेंसिलवेनिया येथे झालेल्या हल्ल्याचा स्मृती दिवस आहे. या हल्ल्यात 2997 लोकांचा मृत्यु झाला होता. या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा हात असल्याचे मानण्यात आले होते. त्यामुळे मे 2011 मध्ये ओसामा बिन लादेनला जिवे मारुन अमेरिकेने हजारो अमेरिकी आणि विदेशी नागरिकांच्या मृत्युचा बदला घेतला.

  या हल्ल्याचे अस्वस्थ करणारे काही फोटोज बघा...

 • 9/11 anniversary rare images of world trade center attack that killed 2997
  बूश यांनी टेलिफोनवरुन व्हाइट हाऊस आणि पेंटागनशी संपर्क साधणे सुरु केले होते. सुरुवातीला हा एवढा मोठा दहशतवादी हल्ला असेल, असे कुणालाही वाटले नव्हते.
 • 9/11 anniversary rare images of world trade center attack that killed 2997
  तिस-या विमानाने पेंटागनवर हल्ला चढवला होता, ज्यामध्ये पेंटागनच्या बिल्डिंगचे बरेच नुकसान झाले होते. तर वॉशिंग्टन डीसीच्या दिशेने जाणारे चौथे विमान पेंसिलवेनियाच्या स्टोनीक्रीक टाउनशिपनजीकच्या एका मैदानात क्रॅश झाले. या हल्ल्यानंतर वॉशिंग्टनमध्ये गंभीर आजार पसरले होते. त्याचा असर आजही तिथे आहे.
 • 9/11 anniversary rare images of world trade center attack that killed 2997
  अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने हा फोटो घेतला होता. हा हल्ला किती भीषण होता, हे यावरुन दिसून येते. या हल्ल्यात 400 पोलिस अधिकारी आणि 3000 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. मृतकांमध्ये 57 देशांच्या नागरिकांचा समावेश होता.
 • 9/11 anniversary rare images of world trade center attack that killed 2997
  व्हाइट हाऊसटे वरिष्ठ अधिकारी घटनेनंतर अॅक्शनमध्ये आले आणि त्यांनी राष्ट्रपती बुश यांना घटनेची माहिती दिली होती.
 • 9/11 anniversary rare images of world trade center attack that killed 2997
  सीआयएचे तत्कालीन चीफ राष्ट्रपती बुश यांच्या नावाने संदेश ऐकवत असताना... 19 दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला होता. दहशतवाद्यांनी दोन पॅसेंजर प्लेन वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टॉवरमध्ये घुसवले होते.
 • 9/11 anniversary rare images of world trade center attack that killed 2997
  तत्कालीन अमेरिकन विदेश मंत्री कॉलिन पॉवेल यांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया अशी होती. दहशतवाद्यांनी चार पॅसेंजर एयअक्राफ्ट हायजॅक केले होते. यामध्ये तीन विमान योग्य ठिकाणी पोहोचले तर चौथे विमान क्रॅश झाले होते.
 • 9/11 anniversary rare images of world trade center attack that killed 2997
  या हल्ल्यात तत्कालीन अमेरिकन राष्ट्रपती जॉर्ज बुश सारासोटा (फ्लोरिडा) च्या एका एलिमेंट्री स्कूलमध्ये तेथील मुलांशी त्यावेळी संवाद साधत होते.
 • 9/11 anniversary rare images of world trade center attack that killed 2997
  उपराष्ट्रपती डिक चेनी, त्यांची पत्नी लिन चेनी आणि फर्स्ट लेडी लाउरा बुश आपापसात चर्चा करताना... हा फोटो यूएस नॅशनल आर्काइव्समधून घेण्यात आला आहे.
 • 9/11 anniversary rare images of world trade center attack that killed 2997
  बुश यांच्या सहका-यांनी त्यांना प्राथमिक माहिती दिली. ते मुलांमधून उठून दुस-या ठिकाणी गेले. येथे टीव्हीवर लाइव्ह घटनाक्रम सुरु होता.
 • 9/11 anniversary rare images of world trade center attack that killed 2997
  हल्ल्याचा संशय अलकायदावर होता. अमेरिकेने दहशतवाद संपवण्यासाठी आणि तालिबानच्या खात्म्यासाठी अफगाणिस्तानवर हल्ला चढवला. अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनने सुरुवातील या हल्ल्याशी संबंध असल्याचे नाकारले होते. पण 2004 मध्ये त्याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर अमेरिकेने सूड घेत 2 मे 2011 रोजी पाकिस्तानच्या ऐबटाबादमध्ये ओसामाचा खात्मा केला होता.

Trending