आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9/11 Attack : लादेनच्या मुलाने 9/11 च्या हल्ल्यातील Plane हायजॅकरच्या मुलीला बनवले आहे पत्नी, घ्यायचा आहे वडिलांच्या खात्म्याचा सूड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लंडन - जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी राहिलेला ओसामा बिन लादेनचा मुलगा हमझा बिन लादेनचे लग्न 9/11 हल्ला करण्यासाठी प्लेन हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्याच्या मुलीसोबत झाले आहे. मोहम्मद अत्ता यानेच दोन विमानांपैकी एक विमान हायजॅक करून ते ट्विन टॉवरला धडकवले होते. याचवर्षी हमझा बिन लादेनचे लग्न झाल्याचे समजते. लादेनचा मुलगा हमझाचे वय 29 वर्षे असून त्याच्या पत्नीचे नाव अद्याप समोर आले नाही. तरीही ती 20 वर्षांची आहे असे सांगितले जाते. या दोघांचा विवाह अफगाणिस्तानात इस्लामिक परमपरेनुसार झाला आहे. अलकायदाचा म्होरक्या ऐमन अल झवाहिरीनंतर या दहशतवादी संघटनेत हमझा बिन लादेन सर्वात मोठा नेता आहे.

 

सासरा होता 9/11च्या हल्ल्यातील सूत्रधारांपैकी एक... 
हमझाचा सासरा मोहम्मद अत्ता हा अमेरिकेवर 11 सप्टेंबर 2001 रोजी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये सूत्रधारांपैकी एक होता. त्यानेच स्फोटकांनी भरलेले विमान हायजॅक करून वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ टॉवरला धडकवले होते. हमझाचा सावत्र भाऊ अहमदने दिलेल्या माहितीनुसार, "हमझा आपल्या वडिलांच्या (ओसामा बिन लादेन) खात्म्याचा सूड घेऊ पाहत आहे. त्यामुळेच, त्याने मोहम्मद अत्ताच्या मुलीसोबत विवाह केला आहे. आम्हाला माहिती नाही की तो नेमका कुठे आहे. परंतु, त्याचा विवाह अफगाणिस्तानातच झाला."

 

ओसामाचा सर्वात प्रिय होता हमझा
अलकायदाचा प्रमुख राहिलेला ओसामा बिन लादेनने अमेरिकेवर हल्ला केल्यानंतर काही दिवस अफगाणिस्तान आणि त्यानंतर पाकिस्तानच्या अॅबोटाबाद येथे आश्रय मिळवला होता. हमझा हा लादेनच्या 3 जिवंत पत्नींपैकी एक खेरिया सबर हिचा मुलगा आहे. लादेन जेव्हा अॅबोटाबाद येथील घरात लपून राहत होता, त्यावेळी त्याच्यासोबत खेरिया सबर आणि हमझासुद्धा राहत होते. याच घरात अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडोंनी 2 मे 2011 रोजी लादेनचा खात्मा केला. आपल्या बापाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हमझा अलकायदाचा प्रचारक बनला आहे. तसेच अल-झवाहिरिने त्याला आपला वारसदार घोषित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...