अमेरिकेवरील 9/11 हल्ल्यामागे / अमेरिकेवरील 9/11 हल्ल्यामागे इराणचाही हात

Agency

May 21,2011 12:07:19 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 9 सप्टेंबर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये इराणचाही हात असल्याचे उघड होत आहे.

या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांकडून लढणाऱ्या वकिलांनी हा दावा केला आहे. वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार, इराणी अधिकाऱ्य़ांनी दहशतवाद्यांना विमानाचे अपहरण करून देण्यात मदत केली होती. तसेच दहशतवाद्यांना हल्ल्यावेळी मदतही केली होती. न्यूयॉर्कमधील मैनहट्टन न्यायालयात दाखल केलेल्या पुराव्यांच्या आधारे इराणचा या हल्ल्यात स्पष्ट होते. इराणमधील तीन सरकारी अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिल्याचे वकिलांनी म्हटले आहे.

X
COMMENT