Home | International | Other Country | 92 Years Old Ron Done 400 Times Blood Donation

92 वर्षीय रॉनचे दर 2 महिन्यांनी रक्तदान, 400 वेळा रक्तदानाने 1200 लोकांचा वाचवला जीव 

वृत्तसंस्था | Update - Apr 16, 2019, 11:14 AM IST

92 वर्षीय रॉन यांचा 189 लिटर रक्तदान केल्याचा विक्रम 

  • 92 Years Old Ron Done 400 Times Blood Donation

    लव्हलँड - अमेरिकेतील लव्हलँडमध्ये राहणाऱ्या ९२ वर्षीय रॉन रिडी यांचा दावा आहे की, ते दर २ महिन्यांनी रक्तदान करतात. गेल्या ६० वर्षांत ४०० वेळा रक्त देऊन १२०० लोकांचे प्राण त्यांनी वाचवले आहेत. १८९ लिटर रक्तदान करण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. लव्हलँड पोलिस व रक्तदान केंद्राकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. लोकांना नेहमी मदत करणारे रॉन सांगतात, रक्तदान करण्यास १९६० पासून सुरुवात केली. सॅन दियागो येथील एका मित्रास पहिल्यांदा रक्तदान केले. तेव्हापासून आतापर्यंत हे कार्य सुरूच आहे.


    त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून ते प्लेटलेट्सही दान करत आहेत. यासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले, आता या वयात प्लेटलेट्स दान करता येणार नाहीत. पण तरुण पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी रक्तदानाचा एक नवाच विक्रम करण्याची इच्छा आहे. नव्या पिढीनेही या कार्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. लोकांचा जीव वाचवल्याचे खूप समाधान मिळते. वाइटालँड रक्तदान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या महितीनुसार, एका एनजीओशी संबंधित समूहात २१७ रक्तदाते आहेत. यात रॉन सर्वात वृद्ध आहेत. रक्तदानात ते सर्वांपेक्षा आघाडीवर आहेत. रक्तदान केंद्राच्या व्यवस्थापक लिज लँबर्ट यांनी म्हटले, एकदा केलेले रक्तदान तिघांचे आयुष्य वाचवते.

Trending