Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | 93 attackers captured in CCTV at waluj midc, 17 arrested

वाळूजमध्ये CCTV फुटेजमधून ओळख पटवून अटकसत्र सुरू; औरंगाबादेत १७, पुण्यात १८५ जणांना अटक

प्रतिनिधी | Update - Aug 11, 2018, 10:28 AM IST

मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदरम्यान वाळूजमध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी १७ जणांना

 • 93 attackers captured in CCTV at waluj midc, 17 arrested

  औरंगाबाद- मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदरम्यान वाळूजमध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी १७ जणांना अटक केली. मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू असताना वाळूज एमआयडीसीतील ६० ते ७० कंपन्यांवर हल्ला करून तरुणांनी प्रचंड तोडफोड व जाळपोळ केली होती.


  पुण्यात १८५ अटकेत
  पुण्यात याच आंदोलनकाळात जिल्हाधिकारी कार्यालय, चांदणी चौक व डेक्कन भागात झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी १८५ जणांना अटक केली. दरम्यान, पुण्यात आता रस्त्यावर आंदोलन न करता साखळी उपोषण करण्याचा निर्णय आंदाेलकांनी घेतला आहे.


  ९३ सीसीटीव्हीत चेहरे चित्रित
  वाळूज परिसरात कंपन्याची तोडफोड करणाऱ्या जमावावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून गुरुवारी सायंकाळी घडलेला हा प्रकार ९३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपला आहे. या फुटेजमधून ओळख पटवून पोलिसांनी अटकसत्र सुरू केले. याच्या तपासासाठी विशेष तीन पथके तयार केली आहेत. विशेष म्हणजे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद शुक्रवारी दिवसभर वाळूज पोलिस ठाण्यात होते. त्यांनी उद्योजकांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना फिर्याद देण्यास सांगितले.


  हा तर मालक-कर्मचारी वाद
  वाळूजमधील जाळपोळ आणि झालेली तोडफोड कंपनीमालक आणि कर्मचारी यांच्यातील संघर्षातून झाली असल्याचा दावा मराठा मोर्चाच्या पुण्यातील समन्वयकांनी शुक्रवारी केला. वाळूजच्या काही कंपन्यांनी कामगारांचे पगार थकवले आहेत, शिवाय औरंगाबाद एमआयडीसीमध्ये स्थानिकांऐवजी परप्रांतीयांना जास्त नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. यामुळेच वाळूजमध्ये भडका उडाला, असे ‘मराठा मोर्चा’च्या आयोजकांचे म्हणणे आहे.


  सुप्रीम काेर्टाने खडसावले

  ताेडफाेड राेखण्यास कायदा दुरुस्तीची वाट पाहणार नाही
  अांदाेलनादरम्यान हाेणारी तोडफोड, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान याची सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेतली. ‘हे गंभीर प्रकार थांबवण्यासाठी सरकारने कायद्यात दुरुस्ती करावी म्हणून वाट पाहणार नाही. यासाठी कठोर निर्देश देऊ,’ असा इशारा कोर्टाने दिला. कोंडुंगल्लूर फिल्म सोसायटीच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे परखड मत मांडले. या वेळी अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ व मराठा अारक्षणासाठीच्या मागणीसाठीच्या अांदाेलनाचा संदर्भ देण्यात अाला.

  सीआयडी चौकशी करा
  वाळूजमध्ये कंपन्यांवर झालेला हल्ला व तोडफोडीशी मराठा आंदोलकांचा काहीही संबंध नाही. या घटनेची सरकारने सीआयडी चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे.
  - विनोद पाटील, समन्वयक, मराठा माेर्चा


  पुण्यात साखळी उपाेषण करण्याचा निर्णय
  गुरुवारी ‘बंद’दरम्यान पुण्यात काही ठिकाणी हिंसाचार झाला. त्याच्याशी मराठा माेर्चातील अांदाेलकांशी काहीही संबंध नाही. मात्र यापुढे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी रस्त्यावर अांदाेलने न करता साखळी उपाेषण करण्याचा निर्णय पुण्यातील अांदाेलकांनी घेतला.


  दारू पिऊन अालेेले १५ ते २० वयाेगटातील टाेळके ४ तास कंपन्यांत करत हाेते ताेडफाेड
  अाैरंगाबादेतील वाळूजच्या कंपन्यांसाठी गुरुवारचा दिवस ‘ब्लॅक थर्सडे’ ठरला. ‘महाराष्ट्र बंद’मुळे कंपन्याही बंद हाेत्या, त्यामुळे इथे काही हाेणार नाही, असेच पोलिस, उद्योजकांना वाटत होते. मात्र घडले विपरीत. एक-एक कंपनीला हजार- हजाराच्या टाेळक्याने लक्ष्य करीत तोडफोड, जाळपोळ केली. हे हल्लेखाेर केवळ १५ ते २० वयोगटातील मुले हाेती. कंपन्यांतील सीसीटीव्हीत ती कैद झाली अाहेत. दुपारी तीन ते संध्याकाळी सातपर्यंत हल्लेखाेर कंपन्यांत ‘नंगानाच’ करत हाेते. त्यांना राेखण्यात पाेलिसही अपयशी ठरले. हल्लेखाेरांना जाणीवपूर्वक दारू पाजण्यात आली होती. ही मुलेे मराठी आणि हिंदी बोलत होती. अनेकांनी तोंडाला बांधलेले हाेते त्यामुळे त्यांची नीटशी अाेळखही पटत नाही. हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय अाहे, पाेलिसांना मात्र याची तिळमात्र खबर नव्हती.

Trending