Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | 93 year old man travel all over country for the programs of Ghazals and Shayari 

देशविदेशात मुशायरा सादर करतानाच आजही करतात वर्तमानपत्र वितरणाचे काम, मेहनतीमुळेच जीवनात समाधानी असल्याची भावना 

प्रतिनिधी | Update - Jan 12, 2019, 11:23 AM IST

वयाच्या ९३ वर्षी शम्स जालनवींचा विशीतील युवकांना लाजवणारा उत्साह; आजही गझल, शायरीच्या कार्यक्रमासाठी देशभरात प्रवास सुरू

 • 93 year old man travel all over country for the programs of Ghazals and Shayari 

  जालना- पांढरी दाढी,अंगात काळा कोट आणि सायकलवर फिरुन वर्तमानपत्र वाटप करणारे एक वृध्द जालना शहरातील अनेकांनी पाहिले असतील.कदाचीत आपला विश्वास बसणार नाही मात्र त्यांचे वय आहे ९३ वर्षे. या वयातही विशीतील युवकांना लाजवणारा उत्साह त्यांच्यात दिसून येतो. त्यामुळेच वर्षभर न चुकता न थकता ते हे काम करतात. त्यांचे नाव आहे शम्स जालनवी.

  उर्दूमधील प्रख्यात शायर असलेल्या शम्स यांनी आपल्या विलक्षण प्रतिभेच्या जाेरावर एकाहून एक सरस शायरी तयार केल्या असून देश-विदेशातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  काही लोकांमध्ये विलक्षण प्रतिभा आणि ऊर्जा असते त्यापैकीच एक नाव म्हणजे शम्स जालनवी. युवकांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वच त्यांच्या शायरीचे चाहते आहेत. त्यामुळेच देशविदेशात अनेक ठिकाणांहून त्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केले जाते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीसुध्दा शम्स यांच्या शायरीचे चाहते होते. मात्र शम्स यांनी त्याचा बडेजाव कधीच न मिरवता आपल्यातला साधेपणा कायम ठेवला आहे. आजही वयाच्या ९३ व्या वर्षीही ते सायकलवर फिरुन उर्दू वर्तमानपत्रे वितरीत करण्याचे काम करतात. शायरीच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले असतील तर तो अपवाद वगळता एरवी न चुकता त्यांचे हे काम सुरू असते. मुले कमावतात तेव्हा आपण हे काम का करता असे विचारले असताना नुसतेच बसून काय करणार असा सवाल शम्स सहजपणे विचारतात. त्यामुळेच आपण नियमितपणे वर्तमानपत्र वितरणाचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

  असा आहे जीवनप्रवास :
  महंमद शमशोद्दीन उर्फ शम्स जालनवी यांचा जन्म १९२६ मध्ये झाला. वयाच्या १४ व्या वर्षापासून त्यांनी गझल व शायरी लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी काही दिवस फिटर म्हणून काम सुरू केले. त्यानंतर १९८६ पासून त्यांनी वर्तमानपत्र वितरीत करण्याचे काम सुरू केले ते अजतगायत सुरू आहे. वर्तमानपत्र वितरीत करण्याचे काम गेल्या ५३ वर्षापासून ते अविरतपणे करत आहेत. हे काम करतानाच त्यांनी गझल व शायरीचे लिखाण व कार्यक्रमानिमित्त देशभरात प्रवास सुरू ठेवला.

  कामातून समाधान
  मुले कमावत असली तरी आपण घरी बसून काय करणार. मेहनत करायची, कष्ट करायचे कारण कष्टावरच माझा विश्वास आहे. त्यासाठी पहाटे लवकर उठून दुपारपर्यंत वर्तमानपत्र वाटतो. नंतर वाचन आणि लिखाण करतो. हे काम मला आनंद व समाधान देते त्यामुळेच जीवनात मी संतुष्ट असल्याचे शम्स जालनवी यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

  गझलांमध्ये विविधता
  जर्द-जर्द चेहरे है, जख्म दिलके गहरे है अशा गझलांमधून ते युवकांना साद घालतात तर हमेशा चढते सूरज की ही पूजा 'शम्स' होती है,बिगड जाती जब किस्मत कोई हमदम नहीं होता असे सांगताना कुणाकडून अपेक्षा ठेवू नये असा संदेश देतात. दिया हुं मै.. जलना काम है मेरा.. हर किसी को लगता अाधा जाम है मेरा यातून जीवनाचे सार सांगतात.

Trending