आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास प्रारंभ, ग्रंथ दिंडीने करण्यात आली सुरुवात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये होत असलेल्या 93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरूवात ग्रंथ दिंडीने करण्यात आली. आजपासून तीन दिवस हे संमेलन चालणार आहे. या संमेलनाला देशभरातील मराठी साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीपासून या संमेलनाची सुरुवात झाली. तसेच संध्याकाळी ४ वाजता संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा अरूणा ढेरे, विक्रम काळे आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ढाले-पाटील यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन करण्यात आले. ग्रंथ दिंडीला साहित्य प्रेमींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. तर लहान मुलामुलींनी लेझीम आणि संगीताच्या तालावर ठेका धरल्याचेही पहायला मिळाले. 

संमेलनात साकारले संत गोरोबाकाकांचे निवासस्थान

यंदा संमेलनात अनेक कलाकृती साकारण्यात आल्या असून त्यापैकी संत गोरोबाकाकांचे निवासस्थान सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यासमोर गाडगे बनवण्याचा आवा, शेणाने सारवलेले अंगण, अशी हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.