आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिठलं-भाकरीवरही साहित्य संमेलन होऊ शकतं, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील यांचे मत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाड्यातील वाड्मयीन विश्वासाठी आनंदाची बातमी आहे. दुष्काळाने पाण्यासाठी आसुलेल्या मराठवाड्यात  साहित्य संपदेचा पाऊस तारुण नेणारा आहे. याचे कारण म्हणजे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा मराठवाड्यातील उस्मानाबादेत होणार आहे. याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

 

यंदाच्या साहित्य संमेलनासाठी एकूण चा प्रस्ताव महामंडळाकडे आले होते. यात उस्मानाबाद, लातूर, नाशिक आणि विदर्भातील बुलढाण्याचा समावेश होता. मात्र मागील बैठकीतच बुलढाणा आणि लातूर वगळण्यात आले होते. त्यामुळे नाशिक की उस्मानाबाद अशी चढाओढ होती. साहित्य महामंडळ मराठवाड्यात असल्याने उस्मानाबाद पहिली पसंती मिळाली.शिवाय आजवर एकदाही उस्मानाबादला संमेलन झाले नसल्यामुळे या शहराचा प्राधान्याने विचार अपेक्षित होता. तसेच सात-आठ वर्षापासून उस्मानाबादकरांची मागणी देखील होती. तेथील साहित्य परिषदेने देखील प्रस्ताव देतांना आग्रह धरला होता. सप्टेंबर महिन्यात या संमेलन स्थळाची पाहणी होणार होती. मात्र १९ सदस्यांनी एकमताने उस्मानाबादला मंजूरी दिल्याने  हे संमेलन जानेवारी २०२० मध्ये उस्मानाबादला होणार असल्याचे ठाले पाटील म्हणाले. या पत्रकार परिषदेस कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष के.एस.अतकरे, उस्मानाबाद साहित्य परिषदेचे शाखा अध्यक्ष नितीन तावडे, रविंद्र केजकर, माधव इंगळे, बालाजी तांबे यांची उपस्थिती होती.
चौकट 


यवतमाळचा वाद उस्मानाबादेत बाद - 
दरम्यान यवतमाळमध्ये झालेले संमेलन हे वादात राहिले. असे एकही संमेलन नाहीत. जे वादाशिवाय होत नाही.या विषयी विचारले असतात. वाद हे उदभवून आणले जातात.परंतु उस्मानाबादचे संमेलन हे चांगले होईल. वाद होणार नाहीत. त्यासाठी काय मग भाजपच्या संमतीने पाहुणे ठरवणार का? यावरही आपल्या शैलीत उत्तर देत ठाले म्हणाले, कोणाला बोलवायचे हे सर्वांशी चर्चेनंतर ठरले मात्र वाद होणार नाहीत. 


संमेलनाध्यक्षही मराठवाड्याचे का?
संमेलन मराठवाड्यात आहे. शिवाय साहित्य महामंडळही त्यामुळे यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष मराठवाड्यातीलच असतील का यावर विषयी ठाले पाटील म्हणाले एकोणावीस जणांच्या समितीतून एक मताने अध्यक्ष निवडला जाईल. मग ते अध्यक्ष कुठलेही असू शकतील. मात्र स्वत:च ठाले पाटील म्हणाले होते की, अध्यक्षपदाचे साहित्यिक मराठवाड्यातच आहेत. गेल्या दोन तीन संमेलनावेळी डॉ.सुधीर रसाळ, न्या. नरेंद्र चपळगावकर, रा.रं.बोराडे ना.धो.महानोर यांची नावे चर्चेत होती.


ऐपतीची मुद्दा - 
उस्मानाबादला उशीर का जर सात-आठ वर्षापासून मागणी होत होती. याविषयी ठाले पाटील म्हणाले मागची दोन संमेलने ही पिंप्रीचिंचड आणि बडोदा येथे झाली ही दोन्ही संमेलने भव्य दिव्य होती. त्यावेळी देखील मराठवाड्यातील ठिकाणांचा उल्लेख झाला मागणीही होती.पण त्यात ऐपत हवी हा मुद्द आला. दुष्काळ, समस्या यामुळे  मागच्या महामंडळांनी  ते टाळले  असे म्हणत. साहित्य संमेलन साधेपणानेही करता येेते. अगदी पिठलं भाकरीवरही संमेलन होवू शकते. दुष्काळ म्हणून काय सांस्कृतिक वाड्मयीन उपक्रम घ्यायचे नाही का? असे म्हणत ठाले पाटील यांनी बाजू सावरुन घेतली.