आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 95% Burned Rape Victim Were Dead, Her Last Words, 'I Don't Want To Die ... Don't Leave The Criminals'

95% जळालेल्या उन्नाव बलात्कार पीडितेचा मृत्यू, शेवटचे शब्द होते, 'मी वाचेन ना? मला मरायचे नाही... गुन्हेगारांना सोडू नका.'

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

९५% भाजलेल्या उन्नाव येथील बलात्कार पीडितेने अखेर जीवनाशी लढाई थांबली. शुक्रवारी रात्री ११.४० वाजता हृदयक्रिया बंद पडल्यावर तिने सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. जामिनावर सुटलेल्या बलात्कारातील आरोपींनी गुरुवारी पहाटे तिला जाळले होते. जळत्या अवस्थेत ती पळून गेली आणि लोकांच्या मदतीने तिने पोलिसांना या घटनेबद्दल माहिती दिली होती. गुरुवारी रात्री उशिरा तिला विमानाने दिल्लीत सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले. ती व्हेंटिलेटरवर होती. रुग्णालयाचे सुपरिटेंडेंट डॉ. सुनील गुप्ता म्हणाले, रुग्णालयात आल्यावर पीडिता सारखे विचारत होती... मी वाचेन ना? तिला जगायचे होते. गुन्हेगाराला सोडू नका, असेही तिने भावाला सांगितले. पाचही आरोपी अटकेत

दोघे तिच्यावर झालेल्या बलात्कारातील आरोपी आहेत.


पोलिसांनी बलात्काराचा गुन्हाही दाखल केला नव्हता. तीन महिन्यांनी कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला. दोन आरोपी जामिनावर सुटल्यावर दुसऱ्याच दिवशी तिला जाळण्यात आले.

आता मी हे युद्ध लढेन : पीडितेची बहीण... 


पिडीतेपेक्षा एका वर्षाने मोठी असलेली तिची बहीण म्हणाली, ‘‘आमची बहीण आमचा आधार होती. ती लहान नक्कीच होती पण आमच्या कुटुंबासाठी प्रेरक होती. आम्ही तिच्या मृत्यूनंतर शांत बसणार नाही. आता आम्ही तिची लढाई लढू. जोपर्यंत आरोपींना शिक्षा मिळत नाही. तोपर्यंत आमची सुरूच राहील. मला आरोपींनी आधीच बदनाम केले आहे. आता काहीही होवो, मलादेखील जाळले तरी चालेल. मी माझ्या बहिणीच्या हत्यारांना सोडणार नाही. मृतदेहाचे पोस्टमाॅर्टम झाल्यानंतर आम्ही लोक सरळ उन्नाव आपल्या गावी जाऊ. अंत्यसंस्कार तिथेच होईल.’’