आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 95% Of The Wood Village Plaza In Japan Completed; There Will Be Cafes, Salons And Medical Store Facilities For The Players

जपानमध्ये लाकडी व्हिलेज प्लाझाचे 95% काम पूर्ण; येथे खेळाडूंसाठी असतील कॅफे, सलून व मेडिकल स्टोअरच्या सुविधा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो : जपानची राजधानी टोकियोमध्ये २४ जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहेत. भारतासह जगभरातील खेळाडूंचा यात सहभाग असेल. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून टोकियोमध्ये लाकडी व्हिलेज प्लाझा तयार करण्यात येत आहे. येथे धावपटूंसाठी कॅफे, एटीएम, बँका, मेडिकल स्टोअर, सलूनसह अनेक सुविधा असतील. ऑलिम्पिकच्या वार्ताकंनासाठी जगभरातील प्रसिद्धी माध्यमे टोकियोत दाखल होतील. या प्लाझामध्येच पत्रकार परिषदा व प्रेस ब्रिफींगची सुविधा असेल. खेळाडूंच्या संघाचे स्वागतही येथेच होणार आहे. बुधवारी या ऑलिम्पिक व्हिलेजचे उद््घाटन करण्यात आले. याचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्लाझामध्ये वापरात असलेली लाकडे ६३ नगरपालिकांकडून दान करण्यात आली आहेत. एप्रिलपर्यंत प्लाझाला अंतीम स्वरूप देण्यात येईल व ऑलिम्पिक सुरू होण्याच्या दहा दिवस आधी प्लाझा खुले होईल.

स्पर्धेनंतर लाकडांचे होणार रिसायकलिंग

ऑलिम्पिकनंतर टोकियोमध्ये पॅराऑलिम्पिक स्पर्धा होतील. प्लाझामध्ये पॅराऑलिम्पिक खेळाडूंसाठी सर्व सुविधा असतील. योजनेनुसार, स्पर्धेनंतर प्लाझामध्ये वापरण्यात आलेली लाकडे नगरपालिकांना परत देण्यात येतील. यानंतर या लाकडाचा वापर दररोजच्या वापरातील वस्तू तयार करण्यासाठी होईल.

  • 5300 चौरस मीटरमध्ये होतोय प्लाझा
  • 156 कोटी रुपये खर्च होतोय तयार करण्यासाठी
  • 40 हजार लाकडांचा वापर केला जात आहे
  • 63 नगरपालिकांनी दान केली लाकडे
  • 24 जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत चालतील ऑलिम्पिक स्पर्धा

बातम्या आणखी आहेत...