आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील ९५ टक्के ग्राहकांना हवेत 'रेडी-टू-मूव्ह फ्लॅट', सात मोठ्या शहरांतील 2,621 लोकांचे केले सर्वेक्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बुकिंगनंतर अनेक वर्षांपर्यंत घर मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या ग्राहकांनी आता नवीन प्रकल्पांपासून दूर राहणेच पसंत केले आहे. तयार फ्लॅट किंवा पुढील सहा महिन्यांत तयार होणाऱ्या फ्लॅटचा शोध ग्राहक घेत आहेत. गृह खरेदी केल्यानंतर वास्तवात काय मिळेल, यालाच ग्राहक या सणाच्या हंगामात प्राधान्य देत आहेत. 


देशातील सात मोठ्या शहरांत प्रॉपर्टी कन्सल्टंट अॅनारॉकच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात हा निष्कर्ष समोर आला आहे. "रिअल इस्टेट कंझ्युमर आउटलूक : एच टू २०१८' नावाच्या या ऑनलाइन सर्व्हेमध्ये २,६२१ लोकांनी भाग घेतला. यामध्ये केवळ पाच टक्के लोकांनी नवीन प्रकल्पात घर खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या सात मोठ्या शहरांमध्ये दिल्ली-एनसीआर, मुंबई मेट्रोपॉलिटन रीझन (एमएमआर), बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि पुणे यांचा समावेश आहे. अॅनारॉकनुसार काही विकासकांनी दिवाळखोरी प्रक्रियेसंदर्भात मागणी केली आहे. तर काही विकासकांचा अनैतिक घडामोडींमध्ये सहभाग असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत गृह खरेदीदारांना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्याची इच्छा नाही. 


रिअल इस्टेट मार्केट विशेषकरून दिल्ली-एनसीआर डिफॉल्ट आणि हाउसिंग प्रकल्पात पझेशन देण्यास उशीर झाल्याने प्रभावित झाले आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गुरगावमधील अनेक प्रकल्प अडकलेले असल्याने गृह खरेदीदारांचे स्वप्न अर्धवट राहत आहे. यात जेपी ग्रुप, आम्रपाली, युनिटेक आणि थ्री-सी कंपनीच्या गृह प्रकल्पांचा समावेश आहे. 


मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेण्याची आवश्यकता असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. बांधकामादरम्यान कोणत्याही कारणाने उशीर झाला तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम बजेटवर पडतो. अनेक शहरांत नवीन लाँच होणाऱ्या प्रकल्पांची संख्या जवळपास नाहीच्या बरोबरीत आहे. या सर्व्हेमध्ये ८१ टक्के लोकांनी मान्य केले की, रिअल इस्टेट क्षेत्रात नियामक नियम लागू झाल्यानंतर पारदर्शकता, नियमितता आणि उत्तरदायित्व वाढले आहे. 


सर्व्हेमधील इतर निकष 
- ५१ टक्के गृह खरेदीदारांची घर भाडेतत्त्वावर देऊन त्यातून काही उत्पन्न मिळवण्याची इच्छा आहे. 
- ३९ टक्के खरेदीदारांची ४० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीचे घर खरेदी करण्याची इच्छा आहे. 
- ५२ टक्के गृह खरेदीदारांची कॉम्पॅक्ट दोन बेडरूम असलेले फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा आहे. 

बातम्या आणखी आहेत...