आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावईबापूंना मागे टाकून टॉपर झाल्या 96 वर्षांच्या आजी; देशभरातून होत आहे कौतुकाचा वर्षाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळ- एका आजीने अक्षरलक्ष्यम साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या परिक्षेमध्ये 98 गुण मिळवल्याचा पराक्रम केला आहे. या परिक्षेत त्या आणि त्यांचा जावई यांनी परिक्षा दिली होती. या परिक्षेत आजींनी जास्त गुण मिळवून पहिला नंबर मिळवला. आजीचे नाव कार्तियानी (वय96) असून त्या अलपुजा शहरातील चेप्पादू गावात राहतात. 

 

नातवांना शिकताना पाहून मिळते प्रेरणा

> आजींसोबत संवाद करत असतना त्या सांगतात, 'मी आता अभ्यास करण्याचे ठरवले आहे. लवकरच मी इयत्ता चौथीचा आभ्यास पुर्ण करणार असून मी आठवी आणि दहावीच्या वर्गाची परिक्षेची तयारी करणार आहे. जेव्हा मी 100 वर्षांची होईल, तेव्हा मी दहावीची परिक्षा देणार आहे. त्यानंतर मला सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे.' पुढे त्या सांगतात, 'आमच्या कुटूंबाची परिस्थीती हालाखिची असल्याने लहानपणी आभ्यास करणे कठीण होते. पण आता मला माझ्या नातवांना शिकताना पाहून खुप प्रेरणा मिळते.' 

 

जावईबापूंना 10 गुणांनी मागे टाकून आजींनी पहिला नंबर मिळवला

> या परिक्षेत कार्तियानी यांच्यासोबत त्यांच्या जावयांनीही इयत्ता तिसरीची परिक्षा दिली होती परंतू त्यांना आजीपेक्षा 10 गुण कमी मिळाले. कार्तियानी आजी सांगतात, ''मी आणि माझ्या जावयांनीही परिक्षेचा आभ्यास केला होता, आम्ही दोघांनीही परिक्षा दिली. परंतू ते उत्तरे विसरले. पण मला सर्व उत्तरे लक्षात होते त्यामुळे मी बरोबर उत्तरे लिहले.'' आता या आजी त्यांचा आभ्यास सुरू ठेवणार असुन त्यांची कम्प्यूटर शिकण्याची इच्छा आहे.

 

किती लोकांनी दिली होती परिक्षा?

> या परीक्षेत चांगले गुण मिळवल्याबद्दल कार्तियानी आजींना मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडून प्रमाणपत्र देण्यात आले. कार्तियानी आजी परिक्षा देणाऱ्या लोकांमध्ये सर्वात वयोवृद्ध परिक्षार्थी होत्या. जवळपास 43 हजार लोकांनी ही परिक्षा दिली होती. 

 

परिक्षेत कार्तियानी आजींना मिळालेले गुण

गणित: 30/30
लिखाण: 30/30
ट्रेनिंग: 28/30

बातम्या आणखी आहेत...