Job / नाेकरी शाेधणारे 97% लाेक कंपनीच्या विश्वासार्हतेला देतात जास्त महत्त्व, आॅनलाईन माहिती नसल्यास करतात दुर्लक्ष 

खाेटा रिव्ह्यू लिहिण्यासाठी फेसबुकने 30 दिवसांमध्ये 55 हजारपेक्षा जास्त पाेस्ट केल्या

वृत्तसंस्था

Aug 21,2019 03:07:00 PM IST

नवी दिल्ली - नाेकरीच्या शाेधात असलेला देशातील युवावर्ग कंपनीच्या विश्वासार्हतेला जास्त महत्त्व देतात. नाेकरीचा शाेध घेताना ज्या कंपन्यांबद्दल आॅनलाइन माध्यमातून जास्त माहिती मिळत नाही अशा कंपन्यांकडे ते दुर्लक्ष करत असल्याचे 'इंडिड' या आंतरराष्ट्रीय जाॅब पाेर्टलच्या अहवालातून समाेर आले आहे.


'इंडिड'च्या अहवालानुसार ९७% लाेक कंपनीच्या विश्वासार्हतेला सर्वाधिक महत्त्व देतात. ज्या कंपन्यांची विश्वासार्हता चांगली नाही वा त्यांच्याबाबत जास्त माहिती उपलब्ध नसल्यास अशा कंपन्यांवर विश्वास ठेवत नसल्याचे ६७ % लाेकांनी सांगितले. करिअरमधील वाढ आणि वेतनश्रेणी याचा क्रमांक यानंतर येताे. नाेकरीसाठी अर्ज करताना ५९ % लाेक कंपनीमधील करिअर वाढीच्या संधी किती आहेत यावर लक्ष देतात. तर ४९ % लाेक कंपनीमध्ये एखाद्या कामासाठी मिळणाऱ्या वेतनाच्या श्रेणीवर लक्ष देतात. नाेकरीतील स्थिरतेबाबत ४९% आग्रही आहेत. ४४ लाेकांनी नाेकरीच्या दरम्यान मिळणारे फायदे, पर्क्स आणि लवचिकता याला महत्त्व देतात.


६९ % जणांनी नाेकरीसाठी अर्ज करताना पहिल्यांदा कंपनीचा आधीच्या व विद्यमान कंपन्यांनी त्यांच्याबाबतीत घेतलेल्या आॅनलाइन आढाव्याला महत्त्व देतात. कंपनी कशी आहे आणि तेथे नाेकरी करणे याेग्य आहे वा नाही याचे कर्मचाऱ्यांकडून मत जाणून घेणे त्यांच्या मते चांगले माध्यम असल्याचे अहवालात म्हटले आहे. प्रत्येक कंपनीने पारदर्शकता राखली पाहिजे तसेच कंपनीशी निगडित सूचना आॅनलाइन उपलब्ध केल्या पाहिजे, असा निष्कर्ष या अहवालातून समाेर आला असल्याचे इंडिडने म्हटले आहे. कंपनीच्या विश्वासार्हतेशी निगडित माहिती उपलब्ध नसलेल्या जाहिराती याेग्य नसल्याचे ७२% लाेक मानतात.


१२ पेक्षा जास्त लाेकांशी चर्चा करून अहवाल तयार केला
देशभरातल्या १२०० पेक्षा जास्त लाेकांशी चर्चा करून इंडिडने हे सर्वेक्षण केले आहे. त्याचबराेबर ५०२ कंपन्यांबराेबरही चर्चा केली आहे. आपल्याकडून नाेकरीच्या जाहिरातीमध्ये कंपनीच्या बाबतीत याेग्य माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे कंपन्यांनी या वेळी सांगितले.

X
COMMENT