आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजुराने अकाऊंट उघडल्यानंतर काही दिवसांत काढले स्टेटमेंट, 99 कोटींचे व्यवहार पाहून त्याला फुटला घाम, पोलिस म्हणाले..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खगडिया - बिहारच्या रहिमा गावातील बलरामच्या खात्यात एकदिवस अचानक 99 कोटी रुपये आले. ते समजताच त्याला धक्का बसला आणि तो थेट पोलिस ठाण्यात गेला. पोलिसांना त्याने याची माहिती दिली. चौकशीनंतर पोलिसांना कर्जाच्या नावाखाली झालेल्या एका मोठ्या घोटाळ्याची माहिती मिळाली. त्यामुळे बँक आणि पोलिस अधिकारीही धक्क्यात आहेत. 


बलराम साह याने सांगितले की, 2009 मध्ये त्याने स्टेट बँक जलकौडा शाखेत पत्नी गुडिया देवी आणि स्वतःच्या नावाने जॉइंट अकाऊंट काढले होते. त्यांना दोन एटीएम मिळाले. एका टोळीच्या सदस्याने कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली ते एटीएम स्वतःकडे ठेवले. बलरामने दुसऱ्या एटीएमद्वारे बँक स्टेटमेंट काढले तर त्याला धक्काच बसला. त्याच्या खात्यात 99 कोटी 99 लाखा 74571 रुपयांचा व्यवहार झाल्याचे दिसले. बँक मॅनेजरलाल सांगितले तर त्यांनी खाते महाराष्ट्रात ट्रान्सफर झाले आहे, त्याचठिकाणी समजेल असे सांगितले. पोलिस तपास करत आहेत, पण हे प्रकरण एटीएम फ्रॉडचे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


पोलिसांनी टोळीच्या म्होरक्याला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. हा म्होरक्या म्हणजे प्रिन्स सायबर क्राइममध्ये तरबेज असल्याचे समोर आले आहे. त्याने टोळीच्या मदतीने बेगूसराय, बलिया मध्येही 30-40 लोकांना खाती उघडून दिली होती. त्यात एका मजुराच्या खात्यातून 7 लाख 13 हजार 53 रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले. पोलिस आणखी एका मास्टर माइंडचा शोध घेत आहेत. तसेच यात अनेक जिल्ह्यांतील वेगवेगळ्या गुन्हेगारांचा समावेश असल्याची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...