Home | National | Other State | 9th class girl student death due to physical abuse by 12 boys

लग्नात आलेल्या 12 मुलांनी 9 वीच्या विद्यार्थिनीवर केला सामुहिक बलात्कार, एक-एक करत राक्षसांनी पार केल्या सर्व सीमा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 21, 2019, 03:37 PM IST

मुलीचा बलात्कार करून तिचा खून केल्याची मुलीच्या आईने दिली फिर्याद

 • 9th class girl student death due to physical abuse by 12 boys

  धनबाद/टुंडी (झारखंड) - शु्क्रवारी येथे लग्नात आलेल्या 12 तरुणांनी 9 वीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार केला. घटनेनतंर विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.


  विद्यार्थिनी कौरैया बाजडीहच्या शेजारील गावातील रहिवासी होती. ग्रामस्थांनी घटनेची माहिती होताच त्यांनी दोन अल्पवयीनांसह 5 आरोपींना पकडून त्यांना चोप दिला. शनिवारी सकाळी उर्वरित पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. यातील मुख्य आरोपी पीडिताच्या शेजारच्याचा नातेवाईक आहे. घटनेनंतर तो फरात होण्यात यशस्वी झाला. पोलिसांना इतर आरोपींनी अटक केली असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे. होपना सोरेन (25), सागर मुर्मू (19), बालेश्वर सोरेन (18) यांसह 15 आणि 16 वर्षीय दोन अल्पवयीनांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून या घटनेत कोलेश्वर मुर्मू, मुकेश हेम्ब्रम, सुरेश मुर्मू, मिथुन सोरेन, छोटू किस्कू, बाबूधन सोरेन तसेच राजन यांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले. पीडिताच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार युवकांवर मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्याचा आरोप केला आहे.


  पीडिताला जंगलात घेऊन गेला होता छोटू
  जामताडा चारेडीह येथील रहिवासी छोटूची पीडितेसोबत पूर्वीपासून ओळख होती. लग्नासाठी वरातीत आल्यानंतर छोटू शुक्रवारी सायंकाळी पीडितेच्या गावात पोहोचला. तो पीडितेला आपल्यासोबत पायी जंगलात घेऊन गेला होता. रात्री दहाच्या सुमारास पीडिता ग्रामस्थांना बेशुद्ध अवस्थेत मिळाली होती.

  पोलिस काय म्हणाले?
  घटनेतील आरोपींनी अटक करण्यात आली असून फरार आरोपीला लवकरच अटक करण्यात येणार आहे. या घटनेची पूर्णपणे चौकशी होऊन गुन्हेगारांना शिक्षा करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Trending