आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know Why Rail Budget Separated From General Budget

जाणून घ्या, RAILWAY BUDGET का आहे एवढे SPECIAL; काय आहे रेल्वेचा इतिहास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1843 मध्ये लॉर्ड डलहौसी यांनी देशातमध्ये इंडियन रेल्वे नेटवर्क सुरू करण्याचा विचार केला, आणि 16 एप्रिल 1853 ला मुंबई ते ठाणे या दरम्यान देशातील पहिली रेल्वे चालवण्यात आली. त्यानंतर पुढे 1921 मध्ये इस्ट इंडिया रेल्वे कमेटीचे चेअरमन सर विल्यम एक्वर्थ (Sir William Acworth) यांच्या लक्षात आले की, संपूर्ण रेल्वे व्यवस्थेला एका वेगळ्या व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांनी 1924 मध्ये सामान्य बजेटमधून रेल्वे बजेटला वेगळे ठेवण्याचा प्रस्ताव मांडला.
जर 1924 च्या काळाचा विचार केला तर, त्यावेळी संपूर्ण बजेटमध्ये रेल्वे बजेटची भागेदारी ही 70 टक्के एवढी होती. देशाच्या बजेटमध्ये रेल्वे बजेटचे एवढे मोठे प्रमाण असल्याकारणाने सर विल्यम यांच्या रेल्वे बजेट वेगळे करण्याचा प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत रेल्वे बजेट हे स्वतंत्रपणे सामान्य बजेटपेक्षा वेगळे सादर केले जाते. जेव्हा रेल्वे बजेटला सामान्य बजेटमधून वेगळे करण्यात आले होते, तेव्हा रेल्वेचा वापर प्रवासी वाहतूकसाठी 75 टक्के तर मालवाहतूकीसाठी 90 टक्के एवढा होता.
पाहूयात भारतीय रेल्वेच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना, संक्षिप्त स्वरूपात...
=> 1843- लॉर्ड डलहौसी यांनी देशात इंडियन रेल्वे नेटवर्कची सुरूवात करण्याचा विचार केला.
=> 16 अप्रैल 1853- मुंबई ते ठाणे या दोन शहरादरम्यान देशातील पहिली रेल्वे सुरू करण्यात आली. या रेल्वेमार्गाचे अंतर 35 किलोमिटर एवढे होते.
=> 15 अगस्त 1854- हावडा ते हुगळी या दरम्यान पहिली पॅसेंजर (सवारी) रेल्वे चालवण्यात आली. त्यानंतर इस्ट इंडिया कंपनीने या रेल्वेला जनतेसाठी खुले केले.
पुढील स्लाईडवर पहा... रेल्वेशी संबंधीत इतर गोष्टी...

(फोटो - सर्व फोटोंचा वापर केवळ बातमीच्या सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.)