आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BUDGET: अडीच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, प्राप्तीकर वाचवण्याचे दिले 2 पर्याय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- संसदेत बजेट सादर करताना अरुण जेटली.)
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचे पहिले बजेट सादर केले. प्राप्तीकराची मर्यादी दोन लाखांवरून अडीच लाख रुपयांवर नेण्याची घोषणा त्यांनी केली आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा तीन लाख रुपये करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या बजेटमध्ये या दोन्ही मर्यादा 50 हजार रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत.
होम लोनवर दोन लाख रुपयांच्या कर्जावरील व्याजाला प्राप्तीकरातून सुट मिळणार आहे. यापूर्वी ही सीमा दीड लाख रुपये होती. सेक्शन 80 सी अंतर्गत करापासून मुक्ती मिळविण्यासाठी गुंतवणुकीची सीमा एका लाखांनी वाढवून दीड लाख करण्यात आली आहे. टॅक्स रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून केवळ स्लॅबमध्ये करण्यात आला आहे. पीपीएफ योजनेत आता वार्षिक एका लाख रुपयांऐवजी दीड लाख रुपये गुंतवता येतील. नवीन टॅक्स तुरतुदींमुळे 6 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीचे 5150 रुपये वाचतील.
अर्थसंकल्पात विदर्भात एम्स रुग्णालय तर पुण्यात बायोलॉजिकल क्लस्टर सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकारी खर्च कमी करण्यासाठी विशेष आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. यासह इतरही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.
चांगल्या दिवसांचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारसमोर आर्थिक सुधारणा आणि जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी ठोस तरतुदी याचे संतुलन राखण्याचे आव्हान होते. रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी रेल्वेची भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर अर्थसंकल्पात इतरही कठोर पावले उचलण्यात आली आहेत.
बजेट सादर करण्यापूर्वी संसदेतील खोली क्रमांक 9 मध्ये झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीला अरुण जेटली उपस्थित होते. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाला बजेटचा सार सांगितला. त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
इतर महत्त्वपूर्ण तुरतुदी खालीलप्रमाणे-
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्टला 200 कोटी रुपये देण्याची घोषणा. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातिल सर्वांत उंच पुतळा उभारण्याचे मोदींनी जाहीर केले होते. - मदरश्यांच्या आधुनिकीकरणासाठी 100 कोटी रुपयांची तुरतुद.
- देशातील 9 विमानतळांवर मिळणार ई-व्हिसा.
- शंभर स्मार्ट सिटीज उभारण्यासाठी 7060 कोटी रुपयांची तुरतुद.
- स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबविले जाईल.
- संरक्षण क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीची टक्केवारी 49 टक्के करण्यात आली आहे.
- बेटी पढाओ, बेटी बचाओ योजनेसाठी दिन दयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना.
- प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेसाठी 14389 कोटी रुपयांची तुरतुद.
- 500 कोटी रुपये खर्च करून आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, विदर्भ आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये एम्‍स सुरू केले जाईल. जम्‍मू, छत्‍तीसगड, गोवा, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये आयआयटी सुरू करण्याची घोषणा.
- अहमदाबाद आणि लखनौ या शहरांमध्ये पीपीपी तत्वावर मेट्रो सुरू केली जाईल.
- शेतकऱ्यांसाठी किसान टेलिव्हिजन ही वाहिनी लॉंच केली जाईल.
- गंगा नदी परियोजनेसाठी 20.37 अब्ज रुपयांचा निधी
- संरक्षण क्षेत्रात 2.29 अब्ज रुपयांचा निधी
- पुण्यात बायोलॉजिकल क्लस्टर सुरु करणार
- पीपीएफमध्ये गुंतवणुकीच्या मर्यादा एक लाखावरून 1.5 लाखाची मर्यादा, करमुक्त गुंतवणुकीत थेट 50 हजारांची वाढ
जेटली यांचे दिवसभरातील कार्यक्रम
1.30 pm : जेटली बजेटची कॉपी राज्यसभेत सादर करणार.
3 pm : जेटली दूरदर्शन आणि वृत्तवाहिन्यांना मुलाखती देणार.

4.30 pm : जेटली इंग्रजी, हिंदी आणि पंजाबी न्‍यूज चॅॅनलवर मुलाखती देतील. यातील प्रत्येक भाषेतील चॅनलला 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे.

8 pm : जेटली अर्थमंत्रालयाच्या डिनरमध्ये सामिल होतील. बजेट तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हे डिनर आयोजित करण्यात आले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, अरुण जेटली संसदेत आले तेव्हा वार्तारांनी त्यांना गराडा घालून प्रश्नांचा भडीमार केला.