आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Government\'s First Budget And 9 Important Faces Who Are Preparing It

बजेटमध्ये या नऊ अधिकार्‍यांची महत्त्वाची भूमिका; कोणत्या पाच गोष्टींवर असेल जोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प (बजेट) येत्या 10 जुलैला संसदेत सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे बजेटचे काउंटडाऊन सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या बजेटच्या प्रिंटिंगचे काम जोमात सुरु आहे. दुसरीकडे, सामान्य जनतेसाठी काय घोषणा होऊ शकतात. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

बजेटच्या प्रिंटिंगसाठी अर्थ मंत्रालयातील शंभर पेक्षा जास्त अधिकारी गेल्या काही दिवसांपासून नॉर्थ ब्‍लॉकमधील बजेट प्रेसमध्ये दिवसरात्र परिश्रम घेत आहेत.
एवढेच नव्हेतर ते एका कैदखान्याप्रमाणे नॉर्थ ब्लॉकमधील एका हॉलमध्ये बंद झाले आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली जोपर्यंत संसदेत आपले भाषण संपवत नाही. तोपर्यंत या कर्मचार्‍यांची सुटका होणार नाही. या अधिकार्‍यांच्या सुरक्षेसाठी डेप्युटी सेक्रेटरी तसेच त्यांच्या नेतृत्त्वात अधिकारी आहेत. बजेटची गोपनियता कायम ठेवण्यासाठी प्रशासनातर्फे कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

अर्थ मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकारीने सांगितले, की बजेट तयार करण्‍यात व्यग्र असलेले अधिकारी आठ रात्री आणि नऊ दिवस जगापासून अलिप्त आहेत.
जाणून घ्या, बजेटमध्ये या नऊ अधिकार्‍यांची महत्त्वाची भूमिका...
सिंधुश्री खुल्‍लर- नियोजन आयोगाच्या सचिव
यूपीए सरकारच्या कार्यकाळात गेल्या वर्षी खुल्‍लर यांचा कार्यकाळ दोन वर्षांनी वाढवण्यात आला होता. नियोजन आयोगातर्फे आर्थिक क्षेत्राशी संबंधित आकडेवारी देण्याचे महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. यासोबत सामाजिक कल्‍याण कार्यक्रमांची दिशा ठरवण्याचीही जबाबदारी पार पाडत आहेत.

जीएस संधू: आर्थिक सेवांचे सचिव
संधू यांचे मुख्‍य कार्य म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील 25 बँकांच्या कार्यपद्धतीवर फोकस करणे. सध्या बॅंकिंग क्षेत्रातील बहुतेक बॅंका ग्राहकांकडून वसुली होत नसल्याने अडचणीत सापडल्या आहेत. संधू यांनी आपले सगळे लक्ष कॉर्पोरेट गव्हर्नसमध्ये सुधारणा व नॉन परफॉर्मिंग एसेट्सवर (एनपीए) केंद्रीत केले आहे.

अरविंद मायाराम: अर्थ सचिव
गत वर्षाच्या बजेटमध्येही मायाराम यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. भारतात पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) सुरु करण्‍यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न केले होते. नवी प्रशासनाच्या इंफ्रास्‍ट्रक्‍चर संबंधीत परियोजनेतही मायाराम यांची भूमिका महत्त्वाची होती.

शक्तिकांत दास: राजस्‍व सचिव
गुड्स अॅण्ड सर्व्हिसेस टॅक्‍सला (जीएसटी) वाढवणे तसेच राज्यांराज्यात योग्य पद्धतीने समन्वय घडवून आण्याची महत्त्वाची जबाबदारी दास यांच्याकडे आहे. जर जीएसटी लागू झाला तर जीडीपीमध्ये 1.5 टक्के योगदान देणार आहे. याशिवाय देशभरात गुड्स आणि सर्व्हिसेसचा मोठा विस्तार होईल.

पुढील स्‍लाइडवर वाचा, पाच अधिकार्‍यांबाबत...
(फाइल फोटोः नवी दिल्ली‍त विविध मंत्रालयांच्या सचिवांची भेट घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी)