आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Railway Budget: वाचा, काय मिळणार सुविधा आणि कुठे धावणार नव्या गाड्या!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी मंगळवारी संसदेत रेल्वे बजेट सादर केला. यात पाच जनसाधारण, नऊ प्रीमियम, 6 एसी एक्‍सप्रेस, 27 एक्‍सप्रेस आणि 8 नव्या पॅसेंजर गाड्यांची घोषणा केली. याता दोन मेमू आरि पाच डेमू रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. यासोबत 11 गाड्यांचा विस्तारही करण्यात आला आहे.

रेल्वेमंत्री गौडा यांनी प्रवाशांना अनेक सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे. ते पुढील प्रमाणे...

प्रवाशांसाठी सुविधा...
- इंटरनेटवर प्‍लॅटफॉर्म आणि जनरल तिकीय मिळेल.
- इंटरनेटवर एका मिनिटाला 7200 तिकीट बुक करण्याची यंत्रणा बसवणार
- पोस्‍ट ऑफिसमध्ये रेल्वे तिकीट
- राजधानी आणि शताब्‍दी सारख्या A-1, A श्रेणीच्या गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा मिळणार
- 10 मोठ्या शहरातील रेल्वे स्टेशन पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून एअरपोर्ट्ससारखे बनवणार
- पुढील दोन वर्षांत मुंबईला 864 नव्या लोकल मिळणार
- साफ-सफाईसाठी हेल्पलाइन बनवण्यात येणार. याची देखरेख सीसीटीव्हीच्या माध्यमातून केली जाणार. 50 स्टेशन्सचे साफ-सफाईचे काम आउटसोर्स केले जाणार
- उच्च दर्जाचे 'पॅक्ड' रेडी-टु-ईट भोजन मिळणार
- रेल्वे स्टेशनवर फूड कोर्ट्स उघडणार. एसएमएस आणि कॉलवरून ऑर्डर देऊ शकतात
- सर्व स्टेशनवर 'पब्लिक-प्राइवेट पार्टनरशिप'च्या (पीपीपी) माध्यमातून फुटओव्हर ब्रिज, लिफ्ट आणि स्वयंचलित जिने उभारले जाणार
- ज्येष्ठ नागरीकांसाठी बॅटरीवर चालणार्‍या कार उपलब्ध करून दिल्या जाणार
- रेल्वेत आणि स्टेशनवर RO चे स्वच्छ पाणी मिळणार
- तीर्थक्षेत्रांसाठी विशेष गाडी धावणार
- केदारनाथ आणि बद्रीनाथपर्यंत रेल्वेमार्ग लवकरच सर्व्हेक्षण
- रेल्वेत असणार वर्कस्टेशन, शुल्क देऊन करता येईल वापर
- 30 सप्टेंबरनंतर एक्सप्रेस गाड्यांचे अनावश्यक थांबे बंद होणार
- दुर्घटना थांबवण्यासाठी अॅडव्हान्स टेक्नालॉजी
- मीठ वाहून नेण्यासाठी विशेष डबे
- पार्सल रेल्वेसाठी स्वतं‍त्र स्टेशन

प्रवाशांची सुरक्षा
- रेल्वे प्रवासात तसेच स्टेशनवर महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेप्रशासनाने रेल्वे सुरक्षा बलात (आरपीएफ) चार हजार महिला कॉन्स्टेबलची भर्ती करण्‍यात येणार आहे. एकट्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाइन सुरु केली जाण्याची घोषणा रेल्वे बजेटमध्ये करण्यात आली. याशिवाय 17 हजार पुरुष आरपीएफची भर्ती केली जाणार आहे.
- रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना मोबाइल फोन दिले जाणार आहेत.

नऊ हाय स्‍पीड ट्रेन धावणार
रेल्वेमंत्री गौडा यांनी देशातील जनतेला 'बुलेट ट्रेन'चे स्वप्न दाखवले आहे. मुंबई-अहमदाबाद या मार्गावर पहिले बुलेट ट्रेन धावणार आहे. हाय स्‍पीड रेल्वेसाठी डायमंड क्‍वाड्रिलेटरल (हीरक चतुर्भुज) योजनेचेही घोषणा करण्‍यात आली. यासाठी 100 कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे. नऊ मार्गावर हाय स्‍पीड रेल्वे धावणार असल्याची घोषणा केली.

या मार्गावर धावणार हायस्पीड रेल्वे...
- दिल्‍ली-कानपूर
- दिल्‍ली-चंडीगड
- दिल्‍ली-आग्रा
- चेन्‍नई-हैदराबाद
- नागपूर-विलासपूर
- मैसूर-बंगळुरु-चेन्‍नई
- मुंबई-गोवा
- नागपूर-सिकंदराबाद
- मुंबई-अहमदाबाद

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, रेल्वे बजेटमधील नव्या गाड्या...
(फाइल फोटो- रेल्वेमंत्री सदानंद गौडा)