आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Ministry Starts Facebook And Twitter Fan Page

Railway Budget आता सोशल नेटवर्कींगवर; रेल्वे मंत्रालयाने केले Facebook आणि Twitter पेज सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: सोशल नेटवर्कींगचे वाढते क्रेझ लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने नुकतेच फेसबुक आणि ट्वीटरवर दोन पेज सुरू केले आहेत. या पेजच्या माध्यमातून रेल्वे बजेटमधील सर्व तपशील लोकांना क्षणाक्षणाला आपल्या फेसबुक अथवा ट्वीटर अकाऊंटवरून पाहायला मिळेल.

आज सादर होणार्‍या बजेटमधील प्रत्येक माहिती ही जनतेपर्यंत पोहोचवता यावी यासाठी रेल्वेमंत्रालयाने हा खास उपक्रम राबवला आहे. सोशल नेटवर्कींगचे महत्त्वमोदी सरकारच्या पूर्वीच लक्षात आले होते, त्यामुळे या माध्यमाचा पुरेपूर वापर करून मोदींनी आपले देशात आपले सरकार आणले. मोदींच्या या शक्कलचा देशावर एवढा प्रभाव पडला की, त्यानंतर प्रत्येक राजकीय नेता, कार्यकर्ता, संस्था आणि उद्योजकांनी या सोशल नेटवर्कींगचा वापर करण्यास क्षणाचाही विलंब केला नाही. त्यातच देशात वाढत्या महागाईने धारण केलेले रौद्ररूप यामुळे नागरिकांची यंदाच्या बजेटकढून खूप अपेक्षा आहेत. नुकतेच रेल्वेमधील झालेली दरवाढ यामुळे महागाई अजून वाढली आहे. त्यामुळे यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये काय असेल याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
रेल्वे मंत्रालयाच्या फेसबुक पेजला लाईक करण्यासाठी इथे क्लिक करा Click Here
रेल्वे मंत्रालयाच्या ट्वीटर पेजला लाईक करण्यासाठी इथे क्लिक करा Click Here

पुढील स्लाईडवर वाचा... नाराजी अथवा पसंती दर्शवा थेट