आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 1.5 Million Earned In The Village Of Rajasthan Before The Release Of PK

PHOTOS: 'PK'च्या रिलीजपूर्वीच राजस्थानच्या गावाने कमावले 1.5 कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंडावा/सीकर- आमिर खान आणि संजय दत्त अभिनीत 'पीके'मध्ये हॅरिटेज कस्बा मंडावा चर्चेत राहणार आहे. सिनेमा रिलीजपूर्वी कस्बाने 1 कोटी 50 लाख रुपये कमावले आहेत. सिनेमाच्या रिलीजसाठी येथील लोकांमध्ये सर्वाधिक उत्साह दिसून येतो. अनेक ग्रुप सिनेमाचा पहिला शो पाहण्यासाठी जाण्याचे प्लानिंग करणार आहे. विशेष म्हणजे, राजस्थानमध्ये मंत्री राहिलेले बीना काक यांचीसुध्दा या सिनेमात एक छोटी भूमिका आहे.
आमिरने राजस्थानच्या लोकांकडून मागितले कपडे-
फेब्रुवारी 2012मध्ये शूटिंगदरम्यान येथील हेरिटेज हॉटेल बलिवूड कलाकार, टेक्निशिअन इत्यादींनी भरलेले होते. मालकाने त्यातून मिळालेल्या कमाईतून हॉटेलला नवीन लूक दिला. सिनेमाच्या शूटिंगशी निगडीत अनिरुध्दसिंह यांच्या मते, पर्यटन स्थळ आणि हवेलींच्या मालिकांमधील अधुनिक सजावटीची प्रेरणा या सिनेमाच्या शूटिंगचा भाग बनली. एक महिन्याच्या शूटिंगच्या वेळापत्रकामुळे अनेक लोकांना येथे रोजगार उपलब्ध झाला होता. पात्रात जिवंतपणा आणण्यासाठी आमिरने येथील लोकांचे कपडे मागून परिधान केले होते. ही वेशभूषाच त्याची या सिनेमातील ओळख बनली. पहिल्यांदा आमिरने जूने मागून सिनेमात परिधान केले आहेत.
ट्रेलरवर आणि गाण्यातून एकवटली चर्चा-
राजकुमार हिराणी यांचे सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्याने सर्वत्र धूम घातली आहे. सिनेमाचे सर्वाधिक शूटिंग मंडावा आणि आसपासच्या गावात सैंसवास, कोलाली, जोशियाच्या ढाणीमध्ये झाली. अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंह राजपूतसुध्दा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.

बीना काक झाल्या होत्या जखमी-
सैंसवासमध्ये शूटिंगदरम्यान सध्याची राज्याची पर्यटन मंत्री बीना काक गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. त्यासुध्दा या सिनेमात अभिनय करत आहे. पायाला फॅक्चर झाल्याने त्यांना उपचारासाठी झूझुन आणि नंतर जयपूरला नेण्यात आले होते.
न्यूड पोस्टर चर्चेत-
पीकेच्या एका पोस्टरवर आमिर ट्रान्झिस्टरसोबत उभा आहे. या पोस्टरवर तो विवस्त्र दिसला होता. त्यामुळे त्याच्यावर बरीच टिका झाली होती. परंतु हिराणी यांनी, 'या न्यूडिटीमध्ये अश्लिलता नाहीये' असे म्हणून वादाला पूर्णविराम लावला होता.
आमिर असंतुलित व्यक्तीच्या भूमिकेत-
आपल्या प्रमोशनल पोस्टर्सविषयी पीके नेहमीच चर्चेत राहिला. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान मानसिक असंतुलन असलेल्या व्यक्तीच्या भूमिकेत सिनेमात दिसला. फेब्रुवारी 2013मध्ये या सिनेमाचे शूटिंग मंडावामध्ये झाले होते. त्यावेळी आमिर पत्नी किरण राव आणि मुलासोबत वीस दिवस येथे राहिला होता. राजकुमार हिराणी यांच्या सिनेमात अनुष्का शर्मासुध्दा मुख्य भूमिकेत आहे. संजय दत्त बँड वादक बनला आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी त्याला तुरुंगातून पॅरोल मिळाला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राजस्थानमध्ये आमिर खानचते अनोखे अंदाज, हे दृश्य सिनेमाच्या शूटिंगवेळी क्लिक झालेली आहेत.